BMW M1000R : BMW ने लॉन्च केली नवी सुपरबाइक; 280 Kmph चं टॉप स्पीड

टाइम्स मराठी । सुपर बाईक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी BMW ने अप्रतिम Bike लॉन्च केली आहे. M1000R असं या बाईकचे नाव असून कंपनीने ती २ व्हेरिएंट मध्ये उपलब्ध केली आहे. या बाईकची प्री ऑर्डर सुरू करण्यात आली आहे. तुम्ही देखील ही बाईक खरेदी करू इच्छित असाल तर डीलरशिपच्या माध्यमातून ऑफिशियल वेबसाईटवर बुक करू शकतात. मात्र या बाईकचा वेटिंग पिरियड प्रचंड मोठा आहे. त्यानुसार ही बाईक जानेवारी 2024 पर्यंत ग्राहकांना मिळेल.

   

स्पेसिफिकेशन

BMW M1000R या बाईक मध्ये 999 cc इंजिन देण्यात आले आहे. हे एक वॉटर कुल्ड इनलाईन 4 सिलेंडर इंजन आहे. जे 209 बीएचपी पॉवर आणि 113 nm पिक टॉर्क जनरेट करते. BMW च्या या बाईकचे टॉप स्पीड तब्बल 280 किलोमीटर प्रति तास इतकं असून अवघ्या 3.2 सेकंदांमध्ये ही बाईक 100 किलोमीटर पर्यंत आपला वेग वाढवण्यास सक्षम आहे. या बाईक मध्ये रेन, रोड, डायनामिक, रेस आणि रेस प्रो 1 हे पाच ड्रायव्हिंग मोड्स उपलब्ध करण्यात आले आहे.

किंमत किती? BMW M1000R

BMW M1000R ही बाईक कंपनीने अप्रतिम डिझाईन केली आहे. ही बाईक प्रीमियम कॅटेगिरीमध्ये असून तिची किंमत 33 लाख रुपये आहे. तसेच या बाईकच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 38 लाख रुपये आहे. या टॉप व्हेरिएंटला कॉम्पिटिशन असे नाव देण्यात आले आहे. या बाईकची डिलिव्हरी जानेवारी 2024 पर्यंत होऊ शकते. त्याचबरोबर कंपनीकडून ही बाईक CBC युनिटच्या माध्यमातून सेल करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग सिस्टीम

M1000R ही एक नेकेड स्ट्रीटफायटर  बाईक आहे. यामध्ये फ्रंट आणि बॅक साईडला ऍडजेस्टेबल सस्पेन्शन देण्यात आले आहे. यासोबतच फ्रंट मध्ये 320 MM ट्वीन डीस्क ब्रेक, आणि रियर मध्ये 220 MM सिंगल डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. यासोबतच ड्युअल चॅनल ABS देखील उपलब्ध आहे. कंपनीने या बाईकमध्ये 45MM फ्रंट फॉक्स आणि रियर मध्ये मोनोशॉक दिले आहे.

अन्य फीचर्स –

M1000R या बाईकमध्ये कंपनीने 6.5 इंच डिस्प्ले उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच स्टार स्टॉप ॲनिमेशन देखील या बाईकमध्ये नवीन बसवण्यात आले आहे. GPS डेटा लॉगर, लॅप ट्रिगर यासाठी इंटरफेस देखील कंपनीने नवीन दिले आहे. या बाईकमध्ये ऑल एलईडी एल्युमिनेशन, रियर यूएसबी चार्जिंग सॉकेट, ऍडॉप्टीव्ह टर्निंग लाईट, इलेक्ट्रॉनिक क्रूज कंट्रोल, हीटेड ग्रीप यासारखे पिक्चर्स देण्यात आले आहे.