BMW ने लाँच केल्या 2 आकर्षक Bike; बघता क्षणीच पडाल प्रेमात

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये लक्झरी कार निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी BMW कंपनीने 2024 R 12 आणि R 12 ninT बाईक लॉन्च केली आहे. यापूर्वी ही बाईक कंपनीने 2013 मध्ये लॉन्च केली होती. आता कंपनीने या बाईकमध्ये मेकॅनिकल चेंजेस आणि फ्रेम अपडेट केली आहे. BMW कंपनीचे R 12 हे मॉडेल बऱ्याच कस्टम बिल्डरसाठी कॅनवास आहे. यामध्ये बरेच फीचर्स उपलब्ध करण्यात आले असून डिझाईन मध्ये देखील अपडेट्स करण्यात आले आहे. आज आपण जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

डिझाईन

2024 R 12 आणि R 12 ninT या 2024 मॉडेलमध्ये मागच्या मॉडेलच्या तुलनेत बरेच बदल केले आहेत. पूर्वीच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असलेले चेसिस 2024 च्या मॉडेलमध्ये अप्रतिम आहेत. या बाईकमध्ये बोल्ट ऑन ट्यूबलर स्टील रियर सबफ्रेम मिळते. या दोन्ही लॉन्च करण्यात आलेल्या बाईक मध्ये नवीन डेव्हलप केलेले ट्यूबलर ब्रिज स्टील स्पेस फ्रेम च्या जवळपास बनवण्यात आले आहे. या दोन्ही बाइक मध्ये 1170cc एयर आणि ऑइल कुल्ड बॉक्सर ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 95 hp पावर आणि 110 nm पिक टॉर्क जनरेट करते. R 12 ninT या बाईकमध्ये देण्यात आलेले इंजिन 109 hp पावर आणि 115 nm पिक टॉर्क जनरेट करते.

फीचर्स

BMW 2024 R 12 आणि R 12 ninT या दोन्ही मॉडेल पैकी R 12 2024 ही एक क्रुझर बाईक आणि R 12 ninT ही रोडस्टर बाईक आहे. यामध्ये USD फोर्क्स, रेडियल माऊंटेड 4 पिस्टन मोनोब्लॉक ब्रेक कॅलिपर, LED लाईट, ड्युअल चॅनेल एबीएस, रायडिंग मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, की -लेस स्टार्ट अँड गो , यूएसबी सी आणि 12 V सॉकेट, डिजिटल डिस्प्ले यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर ऍक्टिव्ह क्रूज कंट्रोल ACC, फ्रंट कॉलिजन वार्निंग FCW, लेन चेंज वॉर्निंग LCW, यासह रायडींग असिस्टंट, एकीकृत यूएसबी सॉकेट, 12 वी ऑन बोर्ड पॉवर सॉकेट या सह स्मार्टफोन चार्जिंग कंपार्टमेंट यामध्ये देण्यात आले आहे.