BMW ने लाँच केली Luxury Car; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये SUV ची चलती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्केटमध्ये बजाज, होंडा, मारुती सुझुकी, यासारख्या बऱ्याच ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपन्या आहेत. या कंपन्या वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये अप्रतिम फीचर्स वाहन लॉन्च  करतात. त्याचप्रकारे बऱ्याच विदेशी कंपन्या देखील इंडियन मार्केटमध्ये त्यांचे वाहन लॉन्च करत आहे. त्यातच आता प्रसिद्ध लक्जरी ब्रँड BMW ने भारतीय बाजारपेठेत X4 M Performance ही SUV लाँच केली आहे. या प्रीमियम SUV मध्ये बरेच फीचर्स उपलब्ध असून या SUV ची बुकिंग देखील कंपनीने सुरू केली आहे. आज आपण जाणून घेऊया या गाडीचे खास फीचर्स आणि किमतीबाबत.

   

डिझाईन

BMW X4 M Performance ही प्रीमियम SUV वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे. या SUV मध्ये नवीन ग्रील उपलब्ध आहे. यासोबतच ब्लॅक बारमध्ये सिंगल पीस फ्रेमवर ग्रील सेटअप करण्यात आले आहे. या कारची चाके सुद्धा मोठी असून कंपनीने चाकांची साईज वाढवून 20 इंच केली आहे. या कार वर M स्पोर्टची बेजिंग देखील उपलब्ध आहे.
फिचर्स

या कारमध्ये 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम ऑप्शन देण्यात आले आहे. यासोबतच कारचे अपहोस्ट्री नव्याने डेव्हलप करण्यात आले आहे. त्यानुसार यामध्ये लेदर फिनिशिंग एम स्पोर्टचे बेजिंग, सीट्स देण्यात आले आहे. तसेच थ्री झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हेडलाईट, LED यासारख्या बऱ्याच फीचर्सने ही कार सुसज्ज आहे.

स्पेसिफिकेशन

BMW X4 M Performance या SUV मध्ये ट्विन टर्बो इन लाईन 6 सिलेंडर पेट्रोल 3.0 लिटर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 355 BHP  पावर आणि 500 nm पीक टॉर्क जनरेट करते. या कार मध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देखील उपलब्ध आहे. हे इंजन माइल्डहाइड्री टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ही कार 4.9 सेकंदामध्ये 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडते. या कारचे टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रति तास इतकं आहे. कंपनीने या SUV मध्ये  48 W लिथियम आयन बॅटरी पॅकचा वापर केला आहे.

किंमत

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास कंपनीने या कारची किंमत 96.20 लाख रुपये ठेवली आहे. तुम्ही देखील ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर BMW च्या ऑफिशियल वेबसाईट वरून डीलरशिपच्या माध्यमातून बुक करू शकता.