आता 10 मिनिटात घरी येणार BOAT चे प्रॉडक्ट; कंपनीने केली इंस्टामार्ट सोबत पार्टनरशिप 

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन शॉपिंग आणि ऑनलाइन पेमेंट सुविधेचा वापर केला जातो. या सोबतच तुम्ही स्विगी  या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फूड आणि इन्स्टामार्ट वरून ग्रोसरी नक्कीच ऑर्डर केल्या असतील. स्विगी मध्ये उपलब्ध असलेल्या इन्स्टा मार्ट च्या माध्यमातून ग्रोसरी  मागवल्यास  एक तासांच्या आत प्रॉडक्ट घरी येते. आता तुम्ही या इन्स्टामार्ट च्या माध्यमातून  इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील ऑर्डर करू शकतात. आणि या वस्तू देखील 10 मिनिटांच्या आत घरी येतील. तुम्ही विचार करत असाल हे कसं शक्य आहे? पण आता हे शक्य आहे. कारण डोमेस्टिक कंजूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BOAT ने स्विगी इन्स्टामार्ट सोबत पार्टनरशिप केली आहे.

   

 स्विगी इन्स्टामार्ट आणि बोट ने केली पार्टनरशिप

स्विगी इन्स्टामार्टच्या माध्यमातून आता ग्राहकांना BOAT ऑडिओ वेअरेबल प्रॉडक्ट 10 मिनिटांच्या आत मागवता येईल. बोट आणि स्विगी इन्स्टामार्ट यांच्या पार्टनरशिप मुळे ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक प्रोडक्स च्या डिलिव्हरी साठी वाट पाहावी लागणार नाही. 10 मिनिटांच्या आत हे प्रॉडक्ट तुमच्या हातात असतील. बोट आणि इंस्टामार्ट या पार्टनरशिप चा उद्देश ग्राहकांच्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्स खरेदी करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणणे हा आहे.

 हे प्रॉडक्ट तुम्ही करू शकतात ऑर्डर

स्विगी इन्स्टामार्टवर तुम्ही ऑफिस आणि इलेक्ट्रिकल्स या कॅटेगरी मधून तुम्ही हे प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात. म्हणजेच आता ग्रोसरी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी सोबतच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील एकाच प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करता येईल. या प्रॉडक्ट मध्ये ब्लूटूथ स्पीकर, TWS इयर बड्स, स्मार्टवॉच, नेकबँड्स यासारखे बरेच प्रॉडक्ट  इन्स्टामार्ट वरून खरेदी करता येतील. भारतीय ग्राहकांना हाय क्वालिटी प्रॉडक्ट एक्सेसिबल प्राईस मध्ये भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

10 मिनिटात मिळते डिलिव्हरी

स्विगी कंपनीचे इन्स्टामार्ट हे 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आले होते. ही सर्विस सुरू केल्यानंतर 25 पेक्षा जास्त शहरांमध्ये क्विक पद्धतीने किराणा पोहोचवण्यात आला. यामुळे आता स्विगी इन्स्टामार्ट ही क्विक पद्धतीने किराणा सामान पोहोचवणारी कंपनी बनली आहे. इन्स्टामार्ट च्या माध्यमातून 10 मिनिटांमध्ये भारतीय ग्राहकांच्या घरात  दैनंदिन वस्तू आणि ग्रोसरी पोहोचण्यासाठी स्वीगीची टेक्नॉलॉजी आणि डिलिव्हरी फ्लीट वापरते.

काय म्हणाले स्विगीचे सह संस्थापक

स्विगीचे सह संस्थापक आणि इन्स्टामार्ट चे प्रमुख फनी किशन म्हणाले की, आम्ही ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी नवीन नवीन मार्ग देखील आम्ही शोधतो. ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू  क्विक मिळाव्या यासाठी आम्ही  BOAT सारख्या लोकप्रिय ब्रँड सोबत पार्टनरशिप करण्यास उत्सुक आहोत.