Boat Lunar Pro LTE : Sim Card असलेलं SmartWatch लाँच; मोबाईल जवळ ठेवण्याची गरज संपली

टाइम्स मराठी । दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  या स्मार्टफोनच्या माध्यमातून आज काल ऑफिशियल पर्सनल कामे एका क्लिकवर केली जातात.  परंतु आता मोबाईल हातात बाळगण्याची गरज नाही. कारण Boat कंपनीने  सिम कार्ड असलेलं पहिले LTE स्मार्टवॉच भारतात लॉन्च केलं आहे. म्हणजेच तुम्ही या स्मार्टवॉच मध्ये सिमकार्ड कनेक्ट करू शकतात. आणि स्मार्टवॉच मध्येच कॉलिंग मेसेजिंग यासारखे फीचर्स वापरू शकतात. कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टवॉचचे नाव  Boat Lunar Pro LTE आहे. यामध्ये कंपनीने ई सिम सुविधा उपलब्ध केली आहे. जाणून घेऊया या फीचर्स आणि स्मार्टवॉच बद्दल.

   

 मोबाईल आणि मेसेज कनेक्टिव्हिटी फीचर्स

Boat Lunar Pro LTE या स्मार्टवॉच मध्ये ई सिम सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार या स्मार्टवॉच मध्ये  ग्राहकांना जिओ ई सिम मिळेल. म्हणजेच ग्राहकांना स्मार्टफोन सोबत ठेवायची गरज भासणार नाही. कारण ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आलेली LTE स्मार्टवॉच मोबाईल प्रमाणेच काम करेल. यामध्ये मोबाईल शिवाय कॉलिंग मेसेजिंग यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतील.

फिचर्स– Boat Lunar Pro LTE

Boat Lunar Pro LTE या स्मार्टवॉच मध्ये 1.39 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कॉलिंग आणि मेसेजिंग फीचर्स सोबत स्मार्टवॉच मध्ये फिटनेस ट्रॅकिंग मोड आणि हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स मिळतील. या सोबतच हार्टबीट ट्रॅकिंग, BP, SpO2 हे फिचर्स देखील यात मिळेल. याशिवाय या वॉच मध्ये सेंडेटरी रिमाइंड फिचर osKrn देण्यात आले आहे. म्हणजेच हे स्मार्टवॉच वापरणारी व्यक्ती एकाच ठिकाणी जास्त वेळ बसलेली असेल तर ही स्मार्टवॉच उठून चालण्याची सूचना देईल. यामध्ये धावणे, सायकलिंग, हॅकिंग यासारख्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहे. 

किंमत किती?

या स्मार्टवॉच च्या किमती बद्दल अजून कंपनीने माहिती उपलब्ध केलेले नाही. परंतु लवकरच हे स्मार्टवॉच ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल. Boat कंपनी या स्मार्टवॉच ची किंमत  सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशीच ठेवू शकते. म्हणजेच हे स्मार्टवॉच बजेट फ्रेंडली असू शकते.