Boat ने लॉन्च केलं नवीन Smartwatch; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपन्या प्रोडक्स लॉन्च करत असतात. आता Boat या इलेक्ट्रॉनिक ब्रँडने मार्केटमध्ये नवीन Smartwatch लॉन्च केली आहे. ही लेटेस्ट लॉन्च करण्यात आलेली Smartwatch अप्रतिम बॅटरी लाईफ आणि इफेक्टिव्ह डिस्प्ले सह उपलब्ध करण्यात आली आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या Smartwatch चे नाव Lunar Tigon आहे. कंपनीने हे नवीन स्मार्टवॉच इंट्रोडक्‍टरी प्राइस क्वीन रिज स्ट्रॅप सह 2899 रुपये एवढ्या किमतीत उपलब्ध केली आहे. यासोबतच मेटालिस्ट ट्रॅप सह स्मार्टवॉच 2999 रुपयात लॉन्च केली आहे. या स्मार्टवॉचमध्ये ऍक्टिव्ह ब्लॅक, स्टील ब्लॅक, मेटल गोल्ड, डीप ब्ल्यू कलर ऑप्शन मिळतात. जाणून घेऊया स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Boat Lunar Tigon या स्मार्टवॉच मध्ये 1.45 इंचचा ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  466×466 पिक्सेल रिझोल्युशन ऑफर करतो. यासोबतच 600 नीट्स पीक ब्राईटनेस सह येतो. या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आलेले राऊंडेड डायल हे स्मार्टवॉचला अप्रतिम  लूक देतात. या स्मार्टवॉच मध्ये देण्यात आलेली बॅटरी पावरफुल असून ही बॅटरी सिंगल चार्जवर 7 दिवसांपर्यंत चालते.

फिचर्स

Boat Lunar Tigon या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड उपलब्ध केले आहेत. यासोबतच वॉचमध्ये  सीडेंट्री अलर्ट, कॅमेरा कंट्रोल,  लाईव्ह क्रिकेट स्कोर, म्युझिक कंट्रोल, वेदर इन्फॉर्मेशन यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच फाईन्ड माय फोन हे फीचर्स देखील उपलब्ध आहे. Boat कंपनीचे हे स्मार्टवॉच  IP67 रेटिंग सह येते. म्हणजेच हे स्मार्टवॉच डस्ट आणि वॉटरप्रूफ आहे. त्यामुळं तुम्ही हे स्मार्टवॉच कोणत्याही परिस्थितीमध्ये वापरू शकतात.

10 कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याची सुविधा

BOAT Lunar Tigon या स्मार्टवॉच मध्ये इन बिल्ट मायक्रोफोन, सहजरीत्या एक्सेस मिळवण्यासाठी क्विक डायल पॅड देण्यात आले आहेत. या डायल पॅडच्या माध्यमातून इमर्जन्सी कॉलिंग करता येऊ शकते. या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने 10 कॉन्टॅक्ट सेव करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर स्मार्टवॉच मध्ये  हार्ट रेट सेंसर, SpO2 मॉनिटरिंग, हेल्थ आणि फिटनेस फीचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय कंपनीने यात 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड उपलब्ध केले आहे.