स्मार्टवॉचची क्रेझ विसरा! आता बाजारात स्मार्ट रिंग उपलब्ध

टाइम्स मराठी | सध्या कॉलेजला जाणाऱ्या तरुणांमध्ये स्मार्टवॉचची चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. स्मार्टवॉचमध्ये असणारे वेगवेगळे फीचर्स तरुणांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता बोट (Boat) कंपनीने एक स्मार्ट रिंग (Smart Ring) सादर केली आहे. स्मार्टवॉचमध्ये असणारे सर्व फीचर्स या रिंगमध्ये उपलब्ध होणार आहेत. ही सिरॅमिक आणि मेटलच्या साहाय्याने बनवण्यात आली आहे.

   

बोटने (Boat) आणलेली स्मार्ट रिंग (Smart Ring) हे वॉटरप्रूफ असणार आहे. या रिंगमध्ये देखील वेळेसोबत इतर सर्व फीचर उपलब्ध होणार आहेत. या स्मार्ट रिंगचे वजन खूपच हलके असणार आहे. याची डिझाईन देखील तरुणांना आकर्षित करेल अशीच असेल. मुख्य म्हणजे, ही रिंग आपण २४ तास कुठेही जाताना वापरू शकतो. अद्याप कंपनीने या रिंगच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केलेली नाही. बोटने (Boat) या रिंगला स्मार्ट रिंग (Smart Ring) वेअरेबल फिटनेस ट्रॅकर असे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच या रिंगमध्ये, फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स असणार आहेत. डेली वॉकिंग स्टेप्स काउंटिंग, कॅलरी ट्रॅकर, हार्ट रेट, बॉडी टेम्परेचर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल, स्लीप मॉनिटरिंग अशा अनेक फिचर्सचा या रिंगमध्ये समावेश असणार आहे.

सध्या बोटने ही स्मार्ट रिंग (Smart Ring) कोणत्या कंपनीची असेल हे देखील सांगितलेले नाही. मात्र ही स्मार्ट रिंग ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळेल अशी माहिती कंपनीने दिली आहे. येत्या काही काळातच कंपनीकडून स्मार्ट रिंगच्या लॉन्चिंगची घोषित करण्यात येणार आहे. तरुणांमध्ये स्मार्टवॉचची क्रेझ पाहता ही स्मार्टरिंग बाजारात आणण्यात आली आहे.

दरम्यान सॅमसंग कंपनी देखील अशीच स्मार्टरिंग (Smart Ring) लवकर बाजारात आणणार आहे. नुकत्याच होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड या इव्हेंटमध्ये सॅमसंग आपले नवीन गॅजेट लॉन्च करणार आहे. यावेळीच कंपनीकडून रिंग देखील लॉन्च करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.