टाइम्स मराठी । आपण कोणत्या न कोणत्या बॉलीवूड स्टार्सला फॉलो करत असतो. त्याचप्रकारे या बॉलिवूड स्टार्स त्यांच्या बेबीज ची काळजी कशाप्रकारे घेत असतील या बाबत प्रत्येकाला कुतूहल वाटत असते. रोजच्या दैनंदिन जीवनात बिझी शेड्युल मुळे बॉलिवूड स्टार्स त्यांच्या मुलांची काळजी आणि देखभाल करण्यासाठी आया ठेवत असतात. या आया बेबीस ची काळजी घेतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या आयांचा महिन्याचा पगार किती असेल. त्यांचा पगार ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. कारण हा पगार हजारात नाही तर लाखोंमध्ये असतो. फक्त बेबी चा सांभाळ करण्याचे त्यांना दोन-तीन लाख रुपये मिळतात.
करीना कपूर –
आपल्या लिस्ट मधून सगळ्यात सर्वात पहिलं नाव म्हणजे करीना कपूर. करीना कपूर खान तिच्या दोन्ही मुलांची काळजी घेण्यासाठी आया ला महिन्याचे 3 लाख रुपये मानधन देते. करीना कपूर खानचे मुलं तैमुर अली खान आणि जेह या दोघांना सांभाळण्यासाठी आयाला एवढे पैसे मिळत असतील हे ऐकून तुम्हाला नक्कीच तुमची नोकरी सोडावी वाटत असेल.
शाहिद कपूर –
आपल्या लिस्ट मधील दुसऱ्या नंबरचं नाव म्हणजे शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत हे त्यांच्या मुलांना म्हणजेच जैन कपूर आणि मिशा कपूर यांना सांभाळण्यासाठी आयाला 80 हजार रुपये महिना देतात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बरेच बॉलीवूड स्टार आयांवर 2-3 तीन लाख रुपये खर्च करतात. याला अपवाद शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हजारांमध्ये आयांना पैसे देतात.
सनी लियोन-
लिस्ट मधील तिसऱ्या नंबरचं नाव म्हणजे सनी लियोन. सनी लियोन तीन मुलांची आई असून तिच्या मुलांना जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत असते. पण काही कामामुळे तिला देखील आया ची मदत घ्यावी लागते. सनी लियोन तिच्या मुलांची देखभाल करण्यासाठी आयांना दर महिन्याला दोन लाख रुपये देते.
करण जोहर-
चौथ्या नंबर चं नाव म्हणजे करण जोहर. मुलगी रुही आणि मुलगा यश या दोघांसाठी करण जोहरने वेगवेगळी आया ठेवलेली आहे. करण जोहर महिन्याला तीन ते चार लाख रुपये मानधन या आयांना देत असतो.
शाहरुख खान-
या लिस्ट मधलं पाचवं नाव शाहरुख खान. शाहरुख खान त्याच्या लाडक्या मुलासाठी म्हणजेच अब्राहम खान ला लहान असताना सांभाळण्यासाठी आयाला पाच लाख रुपये महिना देत होता. परंतु आता अब्राहम मोठा झाल्यामुळे दोन लाख रुपये महिना शाहरुख खान देतो.