आता Whatsapp वरून बुक करा RedBus चे तिकीट; ‘या’ स्टेप्स फॉलो करा

टाईम्स मराठी । RedBus हे जगातील सर्वात मोठे ऑनलाईन बस तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक विश्वास ठेवतात आणि प्रवासासाठी रेड बसच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट बुक करता येते. प्रवाशांसाठी सर्वात जलद आणि सुरक्षित पेमेंट करणार प्लॅटफॉर्म म्हणून रेडबस ओळखलं जाते. त्यातच आता RedBus वरून तिकीट बुक करणं अजून सोप्प झालं आहे. याचे कारण म्हणजे प्रवासी आता व्हॉट्सअॅपवर रेडबस चॅटबॉटद्वारे थेट बस तिकीट बुक करू शकतात

   

जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. यात आता RedBus चा देखील समावेश झाला आहे. म्हणजेच तुम्ही आता व्हाट्सअप च्या माध्यमातून बुकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकतात. बुकिंग प्रक्रिया वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेड बसने या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला आहे. व्हाट्सअप चॅटबॉटच्या माध्यमातून बुकिंग प्रोसेससह भविष्यात प्रवाशांना रियल टाईम सहाय्य आणि वैयक्तिक शिफारशी देखील या माध्यमातून प्रदान करण्यात येणार आहे.

याबाबत RedBus चे CBO मनोज अग्रवाल म्हणाले की, रेड बसच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा आणि प्रवासाचा चांगला अनुभव मिळावा यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा लाभ आम्ही घेत आहोत. व्हाट्सअप चॅटबोट बनवून नाविन्यपूर्ण चैनलच्या माध्यमातून आमचा व्यवसाय वाढावा आणि ग्राहकांसाठी प्रवासाचे नियोजन जास्त परफेक्ट आणि सोयीस्कर व्हावे यासाठी या प्लॅटफॉर्मची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन व्हाट्सअप चॅटबॉट फिचरच्या माध्यमातून तिकीट बुक करणे सोपे होऊ शकते. तिकीट बुक करण्यासाठी आता रेडबस एप्लीकेशन वर जाऊन डाउनलोड करण्याची गरज नसून डायरेक्ट व्हाट्सअप वर हव्या असलेल्या वेळेमध्ये ई तिकीट मिळू शकते. त्याचबरोबर व्हाट्सअप च्या माध्यमातून 24/7 ग्राहकांना सेवा दिली जाईल.

व्हाट्सअप वरून रेड बस तिकीट बुक करण्यासाठी या स्टेप फॉलो करा

1) सर्वात आधी व्हाट्सअप कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये रेड बस चॅटबॉट नंबर 8904250777 हा नंबर सेव्ह करा.
2) त्यानंतर व्हाट्सअप ओपन करून या नंबर वर हाय मेसेज टाका.
3) यानंतर तुम्ही रेड बस चॅटबोटसोबत चॅट सुरू करू शकतात.
4) त्यानंतर चॅटबॉल तुमचं स्वागत करेल आणि तुम्हाला भाषा निवडावी लागेल.
5) त्यानंतर बुक बस टिकीट हा ऑप्शन सिलेक्ट करा.
6) यानंतर तुमचे लोकेशन शेअर करा. आणि व्हेरिफाय करा.
7) लोकेशन टाकल्यानंतर तुम्हाला प्रवासाचे डिटेल्स टाकावे लागतील.
8) त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन वर क्लिक करा
9) तुमच्या प्रवासाचे प्राधान्य म्हणजेच एसी नॉन एसी, प्रीफर डिपार्चर, यापैकी ऑप्शन निवडा.
10) यानंतर प्रवासाचा वेळ आणि भाडे याचा विचार करून बस निवडा.
11) प्रवाशांची प्रवासांची माहिती भरा. आणि तुमचा ड्रॉपिंग पॉईंट निवडा.
12) यानंतर पेमेंट ऑप्शन निवडा. यामध्ये व्हाट्सअप किंवा फोन पे गुगल पे च्या माध्यमातून पेमेंट करता येऊ शकते.
13) तुमचं तिकीट बुक झाल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप चॅट च्या माध्यमातून तुमचे तिकीट डिटेल्स आणि ई तिकीट मिळेल.