मोबाईल- कम्प्युटरमधील Virus दूर करेल ‘हे’ Tool

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल युग सुरू आहे. त्यातच ऑनलाइन पेमेंट आणि सर्व ऑफिशियल पर्सनल कामे डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे सायबर क्राईमचे प्रकार प्रचंड वाढत आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर सर्वत्र डिजिटल पद्धतीने  मोबाईल वरून कामे सुरू झाली. या काळातच पैशांची देवाण-घेवाण देखील डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून वाढली. परंतु यामुळे सायबर क्राईम देखील मोठ्या प्रमाणात  वाढले आहेत. सायबर क्राईम आज-काल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात सरकारकडून सायबर गुन्ह्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसारच केंद्र सरकारकडून अँड्रॉइड स्मार्टफोन युजर साठी सतर्क राहण्याची चेतावणी जारी करण्यात आली होती. आता  हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी नवीन फ्री टूल्स लॉन्च केले आहे.

   

अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये ॲडव्हान्स मैलवेअर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुमच्या मोबाईल मधील डाटा लीक होऊ शकतो. सोशल मीडिया, मेसेजिंग प्लॅटफॉर्म OTT प्लॅटफॉर्म, WhatsApp, ChatGPT, OTT Mini, YouTube Netflix Instagram या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मैलवेअर सॉफ्टवेअर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल होऊ शकते. यासाठी सरकारने सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. आता स्मार्टफोन सिक्युअर करण्यासाठी  DOT ने बरेच बॉट रिमूवल टूल्स लॉन्च केले आहे. या टूल्सच्या माध्यमातून  तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहू शकतो. सरकारकडून हे टूल्स काही महिन्यांपूर्वीच लॉन्च करण्यात आले आहे.

सरकारकडून लॉन्च करण्यात आलेल्या टूल्स च्या माध्यमातून युजरच्या स्मार्टफोनमध्ये अचानक डाऊनलोड होत असलेले मेलवेअर सॉफ्टवेअर  आणि त्यापासून होणाऱ्या फ्रॉडींग पासून वाचण्यासाठी मदत होते. त्यासाठी सरकारकडून आणि डिपार्टमेंट कडून  सर्व स्मार्टफोन युजर्स ला जागृत करण्यासाठी आणि सिक्युरिटी मेजर्स ला प्रमोट करण्यासाठी एसएमएस पाठवण्यात येत आहे. या SMS मध्ये एक लिंक पाठवण्यात येत आहे.

अशा पद्धतीने काम करेल बॉट रिमूवल टूल्स

तुम्हाला देखील तुमचा स्मार्टफोन सिक्युअर करायचा असेल तर तुम्ही  csk. gov. in या पोर्टल वर जाऊन फ्री बॉट रिमूवल टूल डाऊनलोड करू शकतात. डाऊनलोड केल्यानंतर  फ्रॉड कॉल, फ्रॉड मेसेज, आणि मेल वेअर सॉफ्टवेअर यासारखे व्हायरस बॉट रिमूवल टूलच्या माध्यमातून लगेच रिमूव करून टाकते. हे बॉट युजरच्या स्मार्टफोन मध्ये राहुन हॅकर्स साठी डेटा चोरण्याचं काम करतात. या नेटवर्कला बॉटनेट म्हणून ओळखले जाते. हे बॉट रिमूव टूल्स चा उद्धेश युजर्ससाठी सिक्युअर ऑनलाइन एनवोर्मेन्ट डेव्हलप करणे हे आहे.

या पद्धतीने रिमूव करा बॉट

बोट रिमूव करण्यासाठी तुम्ही वेबसाईट वरून डाऊनलोड केलेले टूल्स वापरण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही सायबर स्वच्छता केंद्राच्या पोर्टलवर वेगवेगळ्या टूल्स एक्सेस करू शकतात.  त्यासाठी www.csk.gov.in  या वेबसाईटवर जा. त्यानंतर सिक्युरिटी टूल्स टॅब वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे बॉट रिमूव्हल टूल्स दिसतील. त्यानुसार तुम्ही तुम्हाला हवे असलेल्या कंपनीचे बॉट रिमूव्हल टूल डाऊनलोड करू शकतात. हे टूल डाऊनलोड झाल्यानंतर  तुम्हाला रन करावे लागेल. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनला स्कॅन करून हे टूल्स बॉट रिमूव करेल.