चालत्या कारसमोर अचानक कोणी आल्यास ब्रेक दाबायचा की क्लच?

टाइम्स मराठी । जर तुम्ही कार चालवायला शिकत असाल तर तुम्हाला स्टेरिंग वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गियर बदलणे हे आपण बऱ्यापैकी लक्षात ठेवतो. परंतु खरी मजा तेव्हा येते जेव्हा क्लच ब्रेक आणि एक्सीलेटर या तिघांमध्ये ताळमेळ बसत नाही. बऱ्याच जणांना एक्सीलेटर आणि क्लच या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन होतं. पण गाडी चालवणं ही एक कला आहे. या कलेमधील बारकावे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. हे बारकावे समजल्यानंतर गाडी चालवणे अगदी सोपे होते. आणि अशावेळी ब्रेक आणि क्लच मध्ये कन्फ्युजन होत नाही. ब्रेक आणि क्लच चे कॉम्बिनेशन प्रत्येक परिस्थितीनुसार बदलत असते. त्यानुसार या दोघांचा वापर करावा लागतो. जर चालत्या कारसमोर अचानक कोणी आल्यास ब्रेक दाबायचा की क्लच असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत.

   

बऱ्याचदा चालू कार च्या समोर अचानक एखादा व्यक्ती आडवा येतो. त्यावेळी तुम्हाला कार स्पीड मध्ये थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी घाबरून न जाता शांत डोक्याने निर्णय घेणे गरजेचे आहे. बरेच लोक घाबरून क्लच आणि ब्रेक एक साथ दाबतात. त्यामुळे गाडी न थांबता स्पीड मध्ये चालते. कारण टायर वर गिअरचा कंट्रोल कमी होतो. त्यामुळे अशावेळी फक्त ब्रेक दाबा. ज्या नंतर पूर्णपणे कार थांबेल तेव्हाच तुम्हाला क्लच दाबावा लागेल.

कार ची स्पीड जास्त असल्यास स्पीड कमी झाल्यानंतर डायरेक्ट ब्रेक दाबा

जर तुम्ही हायवे वर आहात आणि पाचवा किंवा चौथा गेअर वर वेगाने कार चालवत असाल तर या ठिकाणी तुम्हाला गाडीचा वेग कमी केल्यानंतर गाडी थांबवावी लागेल. हायवेवर कार चालवत असताना गाडीचा वेग जास्त असल्यामुळे वेग कमी करण्यासाठी किंवा गाडी थांबवण्यासाठी अगोदर ब्रेक दाबून गाडी खालच्या गेअर मध्ये आणली जाते. जेव्हा कारची स्पीड बऱ्यापैकी कमी होईल तेव्हा क्लच न दाबता ब्रेक दाबला जातो.

कारचे स्पीड कमी असेल तर –

जर तुम्ही तुमची कार कमी स्पीड वर पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरवर गाडी चालवत असाल तर त्यावेळी तुम्ही अचानक ब्रेक दाखवू शकत नाही. तुम्ही अचानक ब्रेक दाबल्यास तुमची कार झटका देऊन थांबेल. पण यामुळे गिअरबॉक्स आणि क्लच दोन्ही खराब होऊ शकतात. त्यामुळे गाडी स्लो स्पीड मध्ये असल्यावर सर्वात पहिले क्लास दाबून तुम्हाला ब्रेक दाबावा लागेल. त्याचबरोबर जर तुम्ही ट्राफिक मध्ये असाल, किंवा ट्रॅफिक जाम मध्ये अडकले असाल तर कार कमी स्पीड मध्ये असते. त्यावेळी तुम्ही सर्वात पहिले क्लच दाबल्यानंतरच ब्रेक दाबणे गरजेचे आहे.