BSNL देणार मोफत 4G सिम आणि डेटा; काय आहे ऑफर?

टाइम्स मराठी । जिओ आणि एअरटेल प्रमाणेच BSNL या टेलिकॉम कंपनीने आता ग्राहकांना वेगवेगळ्या रिचार्ज ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. स्वस्तात रिचार्ज असलेल्या BSNL कंपनीकडून वेगवेगळ्या रिचार्ज प्लानच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. आता BSNL ने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. यानुसार आता BSNL च्या ग्राहकांना  मोफत 4G सिम मिळणार आहे. एवढेच नाही तर सिम सोबतच डेटा देखील फ्री देण्यात येणार आहे.

   

BSNL चे अध्यक्ष पिके पूरवार यांनी याबाबत माहिती दिली. BSNL कंपनीकडून डिसेंबर महिन्यात 4G सेवा सुरू करण्यात येणार असून जून पर्यंत ही सेवा संपूर्ण देशात विस्तारित करण्यात येईल असं सांगितलं. 4G सेवा सुरू झाल्यानंतर कंपनी 5G  नेटवर्क अपग्रेड करण्याकडे भर देणार आहे. याबाबत कंपनीच्या आंध्रप्रदेश युनिटने X वर म्हणजेच ट्विटर वर पोस्ट करत माहिती दिली. ट्विटर X वर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये दिलेल्या माहिती नुसार, BSNL या टेलिकॉम कंपनीच्या सिमकार्ड युजर्सला त्यांचे जुने  2G आणि 3G सिम मोफत 4G मध्ये अपग्रेड करण्यात येणार आहे. यासोबतच  BSNL सिम कार्ड युजर्स ला तीन महिन्यांसाठी फ्री 4G डेटा देखील दिला जाणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी युजर्स ला BSNL च्या ग्राहक सेवा केंद्रात, फ्रेंचाईजी किंवा रिटेल स्टोअर ला भेट द्यावी लागेल.

BSNL या टेलिफोन कंपनीला 4G आणि 5G सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 89000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते. या पॅकेजमुळे BSNL ला एक अप्रतिम दूरसंचार सेवा प्रदाता म्हणून ओळख मिळेल. याशिवाय देशातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी आतापर्यंत टॉवर उभारण्यात आलेले नाही, त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यावर BSNL लक्ष केंद्रित करेल. असं मंत्रिमंडळाने जारी केलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आलं. मागच्या वर्षी देशांमध्ये  5G सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानुसार बरेच युजर्स 5G सेवेचा लाभ घेत आहेत. बराच खाजगी दूर संचार कंपन्यांनी 5g नेटवर्कची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. यामध्ये जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांचा देखील समावेश आहे. या क्षेत्रामध्ये बरीच स्पर्धा सुरू असून  BSNL कंपनीला या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी बऱ्याच  गोष्टींचा सामना करावा लागत आहे. आता लवकरच कंपनीकडून 5G सेवा देण्याकडे भर दिला जाईल.