BSNL चा परवडणारा Recharge Plan; 139 रुपयांत 28 दिवस 1.5 GB डेटा

टाइम्स मराठी । स्वदेशी आणि सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने काही महिन्यांपासून 4G सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर 5G सेवा सुरु करण्याचा देखील ही कंपनी प्लॅन करत आहे. पण त्यापूर्वी कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षक करण्यासाठी आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन फक्त 139 रुपयांत असून यामध्ये सलग 28 दिवस दररोज 1.5 GB डेटा वापरायला मिळणार आहे. BSNL चा हा रिचार्ज प्लॅन, Jio, Vi आणि Airtel ला जोरदार टक्कर देईल.

   

जिओ आणि एअरटेल कंपनी या आपल्या यूजरसाठी वेगवेगळे प्लान्स आणि ऑफर्स आणत असतात. जेणेकरून त्यांचे युजर्स ऑफरचा लाभ घेऊ शकतील. त्याचबरोबर आता BSNL ने देखील कमी किमतीत परवडणारे रिचार्ज प्लान लॉन्च केले आहेत. बीएसएनएल कंपनीने असाच एक 139 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा त्यासह अनेक ऑफर्स फायदा तुम्ही घेऊ शकता.

BSNL चा 139 रुपयांच्या प्लॅन मध्ये काय खास आहे ?

BSNL चा हा 139 रुपये वाल्या रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडीटी सोबत 42 जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच दररोज 1.5 GB डेटा तुम्ही वापरू शकतात. त्याचबरोबर जर तुमचा डेली डेटा लिमिट संपला तर 40 kbps एवढा डेटा तुम्ही युज करू शकाल. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग देण्यात आलेलं आहे. मात्र या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगशिवाय कोणतीही सुविधा मिळत नाही.