BSNL Recharge Plan : फक्त 6 रुपयांच्या खर्चात दिवसाला 3GB Data; तुम्हालाही परवडेल हा रिचार्ज

BSNL Recharge Plan । देसी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. वोडाफोन आयडिया, जिओ किंवा एअरटेल या कंपन्यांपेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहकांचा सुद्धा BSNL कडे कल वाढला आहे. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत, ज्यामाध्यमातून दररोज फक्त ६ रुपयांच्या खर्चात ग्राहकांना दिवसाला 3GB Data मिळत आहे. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनबाबत आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

   

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) बद्दल सांगत आहोत तो आहे BSNL चा 2998 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन…. घाबरू नका, आकडा जरी मोठा दिसत असला तरी एकदा हा रिचार्ज केल्यास ग्राहकांना तब्बल ४५५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. म्हणजेच साधं गणित केल्यास या प्लॅनची किंमत दर दिवसाला फक्त 6.58 रुपये पडतेय.. इतक्या कमी पैशात तुम्ही दररोज 3GB पर्यंत इंटरनेटचा वापर करू शकता. याशिवाय अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस ची सुविधाही 2998 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये देण्यात आली आहे.

फक्त जम्मू काश्मीर मध्ये आहे उपलब्ध – BSNL Recharge Plan

वर सुचवलेला BSNL चा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना अगदी परवडणारा असला तरी याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्या हा प्लान फक्त जम्मू-काश्मीर सर्कलमध्ये उपलब्ध आहे. तुम्हीही या भागात राहत असाल तर तुम्ही ही योजना वापरून पाहू शकता. BSNL चा 2998 रुपयांचा प्लॅन रिचार्ज करण्यासाठी, तुम्हाला BSNL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि “मोबाइल प्रीपेड प्लॅन्स” विभागात जम्मू आणि काश्मीर सर्कल निवडा.