आता घरबसल्या खरेदी करा BSNL सिमकार्ड; कंपनीने सुरु केली स्पेशल सर्व्हिस

टाइम्स मराठी । देशी टेलिकॉम कंपनी BSNL त्यांच्या स्वस्त रिचार्जसाठी ओळखू जाते. जिओ, एअरटेल, वोडाफोन -आयडिया या कंपन्यांपेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज अगदी कमी पैशात उपलब्ध असतात, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात BSNL कडे वळत असतो. आता आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने एक नवीन योजना सुरु केली आहे. त्यानुसार, बीएसएनएलने सिम कार्डची होम डिलिव्हरी सुरू केली आहे.. म्हणजेच तुम्ही अगदी घरबसल्या बीएसएनएलचे सिम कार्ड खरेदी करू शकता.

   

BSNL ने घरपोच सिमकार्डची डिलिव्हरी करण्यासाठी Prune सोबत भागीदारी केली आहे. त्यानुसार, ग्राहकांना सिम कार्ड वितरित करणे सुरू होईल. जास्तीत जास्त ग्राहकवर्ग आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बीएसएनएल हे काम करत आहे. तुम्हालाही नवीन सिमकार्ड मागवायचे असेल, तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन प्रून ॲप डाउनलोड करावे लागेल. ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला वैयक्तिक तपशील टाकावा लागेल. तसेच तुमचा मोबाईल नंबर आणि डिलिव्हरीचा पत्ता देखील यामध्ये ऍड करावा लागेल.

एकदा सर्व डिटेल्स त्यामध्ये भरल्यानंतर तुम्हाला घरबसल्या सिमकार्ड खरेदी करता येईल, त्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. मात्र याठिकाणी हि गोष्ट लक्षत ठेवा कि BSNL ची हि नवीन सुविधा फक्त गुरुग्राम आणि गाझियाबादमध्ये सुरु आहे. आपल्या महाराष्ट्रात हि मिळत नाही. परंतु येत्या काही काळात महाराष्ट्रात सुद्धा बीएसएनएलची हि सुविधा सुरु होऊ शकते.