याठिकाणी मिळतंय सर्वात स्वस्त सोनं; प्रतितोळा 17 हजारांचा फरक

टाइम्स मराठी । दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. यातच सोन्याचे भाव (Gold Rate) काही केल्या कमी होत नसून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. भारतामध्ये सोनं खरेदी करणे हे शुभ मानले जाते. लग्न समारंभात, सणासुदीच्या दिवशी बरेच जण सोनं खरेदी करतात. त्याचप्रमाणे या काळात सोनं प्रचंड महाग देखील असते. पण तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल आणि तेही बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला भारताशेजारील अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत त्यातही सोनं अगदी स्वस्तात मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊयात….

   

भारताच्या शेजारील देश भूतान (Bhutan) या ठिकाणी सर्वात स्वस्त सोने विकले जाते. त्याचबरोबर 21 फेब्रुवारी रोजी भूतान मध्ये कर मुक्त सोने विकले जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एकाच दगडात दोन पक्षी मारू शकतात. ते असं की, तुम्ही भूतानला फिरण्यासाठी जाण्याचा प्लान करू शकतात आणि त्यानंतर सोने खरेदीसाठी देखील जाऊ शकतात. भूतान मध्ये 24 कॅरेटच्या दहा ग्राम सोन्याची किंमत ही भारताच्या तुलनेत फार कमी आहे. भूतान मध्ये सोन्याच्या किमतीत आणि भारतातील सोन्याच्या किमतीत फार अंतर आहे. भुतान मध्ये भारताच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 17 हजार रुपयांचे अंतर आहे.

यानुसार जर तुम्ही भूतान ला जाऊन सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की तुम्ही भूतान मधून भारतात किती सोने आणू शकतात. आणि ते कशा पद्धतीने आणू शकतात. जर तुम्ही भूतान वरून भारतामध्ये सोने आणणार असाल तर एक भारतीय पुरुष 50 हजार रुपयांचे सोने खरेदी करून भारतात आणू शकते तर एक महिला एक लाख रुपयांचे सोने भारतात कर मुक्त पद्धतीने आणू शकते.