हिवाळ्यात खरेदी करा या वस्तू; थंडीपासून मिळेल सुटका

टाइम्स मराठी । सध्या हिवाळा ऋतू सुरु झाला असून सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. थंडीच्या दिवसात प्रत्येक व्यक्ती थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि स्वतःला उबदार ठेवण्यासाठी स्वेटर पासून ते उबदार चादर, स्क्रीन प्रॉडक्ट या सर्वांची खरेदी करत असतो. यासोबतच हिवाळ्यात आणखीन काही प्रॉडक्ट्स खरेदी कडे कल वाढताना दिसून येतो. हे प्रोडक्ट म्हणजेच हिटर, इलेक्ट्रिक किटली यासाख्या बऱ्याच प्रोडक्ट चा समावेश यात होतो. तुम्ही देखील हिवाळ्याची खरेदी केलीच असेल. जर अजूनही खरेदी बाकी असेल तर आम्ही तुम्हाला काही मत्त्वाच्या प्रॉडक्ट बद्दल सांगणार आहोत जे कि प्रत्येक व्यक्ती ने हिवाळ्यात खरेदी साठी प्राधान्य दिले पाहिजे. 

   

 इलेक्ट्रिक किटली

यंदा हिवाळ्यात तुम्ही इलेक्ट्रिक किटली खरेदी करू शकतात. ही इलेक्ट्रिक किटली अत्यंत गरजेची आहे. कारण हिवाळ्यात गरम पाणी, चहा, कॉफी याशिवाय सूप घेण्याकडे मोठा कल असतो. अशा वेळी इलेक्ट्रिक किटली उपयोगी ठरेल. मार्केट मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे इलेक्ट्रिक किटली मिळतात. त्यापैकी बजाज कंपनीची बजाज KTX १.८ लीटर DLX इलेक्ट्रिक केटली हे प्रोडक्ट देखील उत्तम आहे. तुम्ही ही इलेक्ट्रिक किटली Amazon या ईकॉमर्स वेबसाईट वरून फक्त 985 रुपयांना खरेदी करू शकतात.

हॉट एयर रूम हिटर 

हिवाळ्यात रात्री आणि सकाळी प्रचंड थंडी असते. अशावेळी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि तुमची रूम गरम ठेवण्यासाठी तुम्ही हॉट एअर रूम हीटरचा वापर करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला तुमची रूम उबदार ठेवण्यास मदत होऊ शकते. सध्या बजाज मॅजेस्टी RX11 2000 वॅट हीट कॉन्व्हेक्टर रूम हीटर प्रचंड खरेदी केले जात आहे. तुम्ही हे हिटर ऑनलाईन पद्धतीने देखील खरेदी करू शकतात . Amazon या शॉपिंग अँप वर या हिटरची किंमत वर  2,398 रुपये एवढी आहे. 

गिझर

हिवाळ्यात गरम पाणी मोठ्या प्रमाणात गरजेचे असते. त्यानुसार तुम्ही गरम पाण्यासाठी गिझर खरेदी करू शकतात. जेणेकरून गरम पाण्यासाठी तुम्हाला सतत गॅस जाळावा लागणार नाही. तुम्ही मार्केट मध्ये उपलब्ध असलेले  Hindware Atlantic Ondeo Evo ipro 15L हे गिझर खरेदी करू शकतात. ऍमेझॉन वर या गिझरची किंमत 13,321  एवढी आहे .