प्रदूषणापासून वाचण्यासाठी खरेदी करा ‘या’ कंपनीचे Air Purifier; हवा शुद्ध करण्यास होते मदत

टाइम्स मराठी । सध्या वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. दिल्ली- मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रदूषणाच्या बाबतीत वाईट परिस्थिती असून आता मुंबईमध्ये देखील प्रदूषण दिसत आहे. वायु प्रदूषणामुळे हवेत जास्त प्रमाणामध्ये विषारी गॅस, हानिकारक कण उपलब्ध असतात. यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो. यासोबतच श्वासांच्या संबंधित रोग देखील होण्याची शक्यता आहे. तुम्ही देखील या प्रदूषणामुळे त्रस्त असाल किंवा तुम्हाला शुद्ध हवा हवी असेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे एअर प्युरिफायर खरेदी करू शकतात. हे एअर प्युरिफायर घरासोबतच ऑफिसमध्ये देखील आरामात वापरण्यात येतात. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एअर प्युरिफायर उपलब्ध आहेत. त्याच्या वापरामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळू शकते. एयर प्युरिफायरला HEPA फिल्टर सोबत जोडले जाते. जेणेकरून आपल्याला शुद्ध हवा मिळेल. आज आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या कंपनीच्या  प्युरिफायर बद्दल.

   

१) HONEYWELL AIR TOUCH AIR PURIFIER

HONEYWELL कंपनीचे हे  AIR TOUCH AIR PURIFIER घरात वापरले जाऊ शकते. हे एअर प्युरिफायर रिमोटच्या माध्यमातून कंट्रोल करता येते. या कंपनीचे प्युरिफायर हाय ग्रेड H13 HEPA फिल्टर आणि ऍक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर सह जोडले जाते. जेणेकरून 99.99% एअर पोल्युशन ला क्लीन करता येईल. या फिल्टर च्या माध्यमातून 99%  शुद्ध हवा मिळते. याशिवाय बॅक्टेरिया मारण्यासाठी यासोबत युवी LED आयोनायजर सुसज्ज करण्यात आले आहे.

२) PHILIPS AIR PURIFIER

फिलिपिन्स कंपनीचे एयर क्लीनर तुम्ही खरेदी करू शकतात. हे एअर क्लीनर प्रदूषणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये 17000 तासांपर्यंत चालणारे फिल्टर वापरण्यात आले आहे. हे फिल्टर 333 /m3 घंटे  CADR सोबत दहा मिनिटांमध्ये  रूम मधील हवा शुद्ध करते.

३) SHARP AIR PURIFIER FOR ROOM

या एअर प्युरिफायरमध्ये HEPA फिल्टर, हेज मोड, धूळ आणि सुगंधी  सेंसर देण्यात आले आहे. या एयर प्युरिफायर मध्ये तुम्हाला चार स्टेज फिल्टरेशन मिळेल. हे फिल्टरेशन 99.99% एअर पॉल्युशन ला क्लीन करते.

४) MI AIR PURIFIER – WHITE

हे एअर पुरिफायर तुम्ही घरामध्ये वापरू शकता. घरासाठी हे प्युरिफायर अप्रतिम असून  आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त लोकांनी खरेदी केले आहे. यासोबतच या कंपनीच्या प्युरिफायरला 4.5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. हे प्युरिफायर 2 HEPA फिल्टर आणि OLED टच डिस्प्ले सह उपलब्ध आहे. हे एअर क्लीनर हवेतील प्रदूषणाला 99.97% दूर करते आणि शुद्ध हवा देते.