Calibro 650 क्रुजर बाईक लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । इटालियन टू व्हीलर निर्माता कंपनी मोटो मोरनीने Calibro 650 या बाईकचे ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्चिंग केले आहे. ही या कंपनीची पॉप्युलर बाईक असून लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये देखील लॉन्च होऊ शकते. Calibro 650 बाईक न्यू क्रूजर बाईक आहे. आज आपण या बाईकचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि तिच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊया.

   

डिझाईन

मोटो मोरनीची ही Calibro 650 क्रुझर दिसायला अतिशय स्टायलिश आणि आकर्षक आहे. या बाईक मध्ये चारही साईडने श्राऊड सोबत एक गोलाकार LED हेडलाईट देण्यात आले आहे. या बाईकमध्ये स्लिम फ्युल टॅंक उपलब्ध करण्यात आला या टँकची क्षमता 15 लिटर इतकी आहे. या बाईकमध्ये छोटा वायझर आणि कम्फर्टेबल्स स्प्लिट सीट सेटअप देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन– Calibro 650

Calibro 650 या बाईक मध्ये 649 सीसी पॅरेलल ट्विन इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन सहा स्पीड गिअर बॉक्सला जोडलेलं असून 60 BHP पावर देते. या बाईकमध्ये देण्यात आलेले हे इंजिन सिल्वर एलिमेंटसह कट आणि क्रीज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे या बाईकला अप्रतिम लूक प्रदान होतो.  या स्पोर्ट बाईकच्या फ्रंट साईडने टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्स आणि रियर मध्ये ड्युअल रियल स्प्रिंग्स  उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच तिच्या ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल चॅनेल ABS आणि जे जुआन केलीपर्स यासह सिंगल फ्रंट आणि रियल डिस्क ब्रेक उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये 18 इंच ब्रँच आणि 16 इंच रियर अलॉय व्हील उपलब्ध आहे.

Calibro 650 या बाईकमध्ये रेड आणि ब्लॅक कलरसह दोन टोन पेंट स्कीम उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे गाडीला अतिशय जबरदस्त असा लूक मिळतोय. भारतात ही गाडी लाँच झाल्यानंतर रॉयल एनफिल्ड 650 ट्वीन, रॉयल एनफिल्ड सुपर मिटीओर 650, कावासाकी वल्कन S, बेनेली 502  C यासारख्या बाईकला टक्कर देईल.