टाइम्स मराठी । भारतात बॉलीवूड सेलेब्रेटी आणि क्रिकेटपटू यांना खूप किंमत आहे. अमाप पैसे आणि प्रसिद्धी या २ क्षेत्रात मिळतो. बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू आपल्या लक्झरी कारची आवड जोपासताना दिसतात. काही सेलिब्रेटी तर सतत वेगवेगळ्या कार खरेदी करताना दिसतात. बाजारात एखादी नवीन कार आली की ती लगेच खरेदी करून टाकायला देखील सेलिब्रिटी मागे पुढे पाहत नाहीत. सध्या बहुतांश सेलिब्रिटींकडे लक्झरी सेडान कार आहे. तर काहींकडे SUV आणि लिमोजिन कार आहे. त्यामुळे आज आपण अशाच सेलिब्रेटिंगकडे असणाऱ्या कारची माहिती जाणून घेणार आहोत.

क्रिकेटपटू विराट कोहली
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडे सर्वात उच्च श्रेणीची फरारी कार आहे. विराट कोहलीला महागड्या गाड्यांचे आवड असल्यामुळे तो सतत बाजारात येणारे नवनवीन कारचे मॉडेल्स खरेदी करताना दिसतो. परंतु विराटकडे सर्वात स्पेशल टाटा सफारी आहे. विराटने कारची आवड जपत बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, बेंटले फ्लाइंग स्पर लक्झरी कार, ऑडी आर 8 एलएमएक्स लिमिटेड एडिशन, ऑडी आर8 व्ही10 देखील कार खरेदी केल्या आहेत.

अभिनेता रणवीर सिंह
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहकडे देखील आलिशान गाड्या आहेत. बॉलीवूड स्टारपैकी रणवीर सिंह असा एकमेव अभिनेता आहे त्याच्याकडे अॅस्टन मार्टिन रॅपिड आहे. याचबरोबर त्याच्याकडे, मर्सिडीज मेबॅच एस500, मर्सिडीज बेज जीएलएस 350 डी या देखील कार आहेत. खास म्हणजे रणवीरकडे लॅम्बोर्गिनी ही देखील कार आहे. या कलेक्शन मधूनच त्याच्या कार जपण्याची आवड दिसून येत आहे.

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या
भारतीय संघाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्याकडे तर कारचे दुकानच आहे. हार्दिक पांड्या कडे सर्वात महागड्या कार आहेत. यामध्ये मर्सिडीज जी 63, BMW 5 सिरीज, Rolls Royce, Mercedes Benz AMG G63, Lamborghini Huracan Evo, अशा कारचा समावेश आहे. यासोबतच त्याच्याकडे BMW 6 Series Gran Turismo, Audi A6, Land Rover Range Rover Vogue, Mercedes G-Wagon अशा कारचे देखील कलेक्शन आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना
नॅशनल क्रश असणारी रश्मिका कार खरेदी करण्याच्या बाबतीत वेडी आहे. तिच्याकडे अनेक नवनवीन कारचे कलेक्शन आहे. नुकतीच तिने एसयूव्ही खरेदी केली आहे. याचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. यासोबतच रश्मिकाकडे मर्सिडीज-बेंझ सी-क्लास आणि ह्युंदाई क्रेटा या जबरदस्त कार देखील उपलब्ध आहेत. अशा अनेक कार रश्मिका मंदानाच्या कलेक्शन मध्ये आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर
बॉलीवूडमध्ये सर्वात क्युट असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूरचे नाव घेतले जाते. या श्रद्धा कपूरने कारची आवड जपत आपले स्पेशल असे कार कलेक्शन केले आहे. श्रद्धा कपूरकडे असणाऱ्या महागड्या कार बद्दल सांगायचे झाले तर, तिच्याकडे मर्सिडीज-बेंझ जीएलए 200 डी, टोयोटा फॉर्च्युनर, मर्सिडीज-बेंझ एमएल 250 अशा कार आहेत. यासोबत तिने अनेक वेगवेगळ्या कारचे देखील खरेदी केली आहे.