Car ची मजबुती कशी चेक करतात? कोणती टेस्ट केली जाते?

टाइम्स मराठी । घरासाठी होम रेमेडीज घेत असताना आपण त्या वस्तूचा टिकाऊपणा क्वालिटी या सर्व गोष्टी विचारात घेतो. एखाद्या वस्तूचा टिकाऊपणा आणि कॉलिटी त्या प्रॉडक्टच्णिची हार्डनेस आणि मजबुतीवर अवलंबून असते. त्यानुसार आपण चेक करत असतो. त्याचबरोबर जर तुम्ही कार खरेदी करत असाल तर तुम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार देखील करतात. यामध्ये सेफ्टी, कारचा टिकाऊ पणा, कारची क्वालिटी यासारख्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आपण करत असतो. अशातच जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कारची मजबुती क्वालिटी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का कारची मजबुती आणि टिकाऊ पणा कशा पद्धतीने चेक केली जाते. या गोष्टी मोजण्याच्या पद्धती, पॅरामीटर्स मानदंड काय आहे. हे आपण आज जाणून घेणार आहोत.

   

या संस्थांकडून घेतली जाते क्रॅश टेस्ट

क्रॅश टेस्ट करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था जगभरात आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम ANCAP, ऑटो रिव्यू कार असेसमेंट प्रोग्राम ARCAP, चीन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम C-NCAP यूरोपीय न्यू कार असेसमेंट प्रोग्राम Euro NCAP, अलजाइमायनर डोईचर ऑटोमोबाईल क्लब जर्मनी ADAC, जापान न्यू कार असेसमेंट प्रोग्राम JNCAP, लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अमेरिका NCAP यासारख्या बऱ्याच संस्थाकडून क्रॅश टेस्ट केली जाते. भारतामध्ये जास्त करून ग्लोबल NCAP आणि युरो NCAP या दोन्ही टेस्ट फेमस आहेत.

काय आहे क्रॅश टेस्ट

कारची मजबुती, कारमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षा, यासोबतच पायी चालणाऱ्या व्यक्तींना नुकसान होऊ नये यासाठी क्रॅश टेस्ट केली जाते. ही क्रश टेस्ट एक परीक्षण आहे.या परीक्षणाच्या माध्यमातून कारची सिस्टीम आणि विकल कंपनी यांची सुरक्षित डिझाईन मानक निश्चित करण्यासाठी मदत होते. या क्रॅश टेस्टच्या माध्यमातून जगभरात वेगवेगळ्या संस्था कारला सेफ्टी रेटिंग देतात. या सेफ्टी रेटिंगच्या माध्यमातून प्रवाशांची सुरक्षा, प्रवासादरम्यान मुलांसाठी आणि वयस्कर यांची सुरक्षा याबाबत वेगवेगळी रेटिंग दिली जाते. भारतामध्ये बऱ्याच विकल्या गेलेल्या वाहनांची Global NCAP आणि Euro NCAP या माध्यमातून क्रॅश टेस्ट घेतली जाते.

काय आहे भारत NCAP

भारत NCAP म्हणजे भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम आहे. याच्या माध्यमातून क्रॅश टेस्ट मूल्यांकन करता येईल. त्यानुसार वाहनांना 0 ते 5 स्टार रेटिंग देण्यात येईल. सरकारने आता भारत NCAP या चाचणीच्या प्रोटोकॉलला जागतिक क्रॅश टेस्ट प्रोटोकॉलसोबत जोडले आहे. त्याचबरोबर नवीन नियमानुसार वेबसाईटवर 1 ते 5 पर्यंतचे रेटिंग देण्यात येईल. यामध्ये भारत NCAP साठी वेगवेगळे पॅरामीटर्स तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार कार पादचारीनुसार अनुकूल डिझाईनचे मूल्यांकन, कारचे स्ट्रक्चर आणि सेफ्टी, कार मध्ये देण्यात आलेल्या सेफ्टी टेक्नॉलॉजी, कार मधील वयस्कर आणि लहान बालकांची सेफ्टी, कारला देण्यात आलेली 0 ते 5 रेटिंग या सर्व पॅरामीटर्सचा यात विचार करण्यात येणार आहे.

एक ऑक्टोंबर पासून सुरु होणार BNCAP क्रॅश टेस्ट

या सोबतच भारत सरकारने एक ऑक्टोंबर पासून BNCAP ही क्रॅश टेस्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात रोड एक्सीडेंट किंवा कार एक्सीडेंट चे प्रमाण बरेच वाढत आहे. या एक्सीडेंट मध्ये बऱ्याच जणांचा जीव देखील जातो. हे रोड एक्सीडेंट कधी माणसाच्या चुकांमुळे, कधी रस्त्यात असलेल्या खड्ड्यांमुळे तर कधी गाड्यांच्या खराबीमुळे होतो. या दुर्घटना रोखण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता एक ऑक्टोंबर पासून BNCAP क्रॅश टेस्ट अनिवार्य करण्यात येणार आहे.

या कारची होईल BNCAP क्रॅश टेस्ट

BNCAP ही टेस्ट 3.5 टन पेक्षा कमी वजनाच्या मंजूर m1 श्रेणीच्या वाहनांना लागू करण्यात येणार आहे. यासाठी आता देशातील सर्व कार निर्माता कंपन्यांना केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीला फॉर्म 70 ए मध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतर परीक्षण एजन्सी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टॅंडर्ड म्हणेज ASI 197 नुसार वाहनांचे मूल्यांकन करेल. आणि फॉर्म 70 बी यानुसार मूल्यांकन अहवाल नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीला सादर करण्यात येईल. त्याचबरोबर नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीला ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टॅंडर्ड ASI 197 यानुसार वाहणांना ऑटोमोटिव्ह स्टार रेटिंग देण्यात येईल.