TIMES MARATHI | टाटा मोटर्स कंपनीचे वाहन भारतीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकले जातात. त्याचबरोबर टाटा मोटर्स ही भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त कार विकणारी कंपनी आहे. या कंपनीच्या टाटा पंच या कारला ग्राहकांकडून प्रचंड पसंत केले जाते. असंच काही महिन्यापूर्वी टाटा मोटर्स कंपनीने सीएनजी वेरिएंट लॉन्च केले होते. या सीएनजी टाटा पंचची ग्राहकांनी प्रचंड प्रतीक्षा केली. टाटा कंपनीच्या या कारचा वेटिंग पीरियड प्रचंड मोठा आहे.
टाटा मोटर्सची TATA punch CNG या कारची कार्सलव्हर मोठ्या प्रमाणात वाट पाहत आहेत. सीएनजी एसयुव्हीची रेस परफेक्ट बनवण्यासाठी नवीन टाटा मोटरची टाटा पंच सीएनजी लॉन्च केली होती. हे टाटा मोटर्सचे TATA punch हे चौथे सीएनजी मॉडेल आहे. या एसयुव्ही कार ला 5 व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आले असून सीएनजी कार ची किंमत 7.10 लाखापासून 9.68 लाख रुपयांपर्यंत आहे. आणि टाटा कंपनीच्या टाटा पंच पेट्रोल व्हेरिएंट ची किंमत 6 लाख रुपयांपासून 9.52 रुपयांपर्यंत आहे.
TATA punch CNG या कार मध्ये 1.2 लिटर 3 सिलेंडर इंजन वापरले असून हे इंजन पेट्रोल वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिन सह हे इंजिन 86 एचपी पॉवर जनरेट करते. यासोबतच 113 nm टॉर्च जनरेट करते. या कारच्या सीएनजी मोड मध्ये 73.4 hp पॉवर आणि 103 nm टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर या कारला फक्त 5 स्पीड मॅन्युअल गिअर देण्यात आलेले आहे. म्हणजेच सीएनजी ग्राहकांना या कार मध्ये ऑटोमॅटिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही .
भारतीय बाजारामध्ये टाटा पंच पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळे या सीएनजी कारसाठी ग्राहकांना 12 हप्त्यांचा वेट करावा लागतो. आणि पेट्रोल मॉडेल साठी ग्राहकांना चार आठवड्यांचा वेट करावा लागतो. या दोन्ही कारची भारतीय बाजारपेठेमध्ये प्रचंड डिमांड आहे. आता टाटा कंपनीकडून लवकरच टाटा पंच ही ईव्ही व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. टाटा 45 सीएनजी मॉडेल प्रमाणे टाटा इलेक्ट्रिक कारला ग्राहक किती पसंत करतात हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.