टाईम्स मराठी । जर तुमच्या गाडीचे मायलेज वाढत नसेल तर आपल्याला वाटतं की आपली गाडी खराब झालेली आहे. आणि रिपेअर करायला प्रचंड खर्च येईल. यामुळे तुम्ही परेशान असाल तर तुम्ही कुठेही न जाता तुमचा प्रॉब्लेम आज आम्ही सोडवणार आहोत. बऱ्याचदा आपण चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळे गाडीचे मायलेज कमी होते. पण आपण आपल्या गाडीचे मायलेज वाढवू शकतो. आणि पेट्रोलचा खर्च देखील वाचवू शकतो. त्यासाठी नेमकं काय करावं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) ब्रेक आणि वेग सांभाळणे गरजेचे
बऱ्याच वेळेस गाडी मायलेज देत नाही आणि जास्त इंधन खर्च होतं. पण आपण चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळे हा प्रॉब्लेम येत असतो. त्याचबरोबर आपण वेग वाढवल्यामुळे आणि ब्रेक लावल्यामुळे फ्युल जास्त खर्च होते. म्हणजेच तुम्ही जेवढा वेग वाढवाल आणि त्याचवेळी ब्रेक लावाल तेवढे इंधन जास्त जळते. पण जर आपण गरजे पुरताच ब्रेक लावला आणि गाडीचा वेग प्रमाणात ठेवला तर आपल्या गाडीचे मायलेज वाढवू शकते.
२) टायरमध्ये हवा चेक करणं गरजेचं
जर आपल्या गाडीच्या टायर मध्ये हवा नसल्यास किंवा कमी असेल तर गाडी मायलेज देत नाही. त्यामुळे सतत टायर मधली हवा चेक करत राहणे गरजेचे आहे. कधी कधी आपण टायरकडे दुर्लक्ष करतो, पण अशामुळे आपलंच नुकसान होऊ शकत. त्यामुळे गाडीच्या टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा आहे का हे चेकर करत रहा.
३) इंजिनचे एयर फिल्टर तपासणे –
गाडी चालवत असताना आपण इंजिनचे एअर फिल्टर तपासत नाही. त्यामध्ये बराच वर्षापासून घाण साचलेली असू असते. त्यामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेत अडचण येते. जर ही घाण साफ केली तर इंजिन चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. यामुळे तुमच्या गाडीचे मायलेज वाढू शकते.