Car Operate On Fingers : नाद खुळा!! चक्क बोटांच्या इशाऱ्यावर धावते Car; मुंबईतील IIT विद्यार्थ्याची कमाल

टाइम्स मराठी । तुम्हाला जर फक्त बोटांच्या इशाऱ्यावर कार (Car Operate On Fingers) चालवायला किंवा थांबवायला सांगितली तर ते शक्य होणार नाही. कारण कार चालवत असलेला व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवर बसून स्टिअरिंगच्या माध्यमाने कमांड देऊन कार थांबवू शकतो आणि चालवू शकतो. परंतु आयआयटीच्या एका विद्यार्थ्याने फक्त बोटांच्या इशाऱ्यावर धावणारी कार बनवली आहे. ही कार एखाद्या शास्त्रज्ञाने नाही तर 21 वर्षाच्या मुलाने बनवली आहे.

   

मुंबईमध्ये शिकणाऱ्या आयआयटीच्या संशोधकाने स्टेरिंगला हात न लावता कारला लांब उभे राहून इशारे केले आणि ती कार व्यवस्थित धावू लागली. हे तंत्रज्ञान विकसित करणारा फक्त 21 वर्षाचा मुलगा असून त्याला लहानपणापासूनच वेगवेगळे रिसर्च करण्याचा छंद आहे. या छोट्या संशोधकाचे नाव मेहुल बोराड असं आहे. मेहुल बोराड हा मूळचा राजस्थान येथील असून तो हैदराबादला शिक्षण घेत होता. त्यानंतर त्याने मुंबईमध्ये आयआयटीला प्रवेश घेतला. यंत्रावर असलेल्या प्रेमापोटी त्याने आयआयटी मुंबई ऍडमिशन घेण्याचा निर्णय घेतला होता.

मेहुल बोराड हा घरातील भंगार सापडलेले यंत्र शोधून त्यांच्यावर काम करत होता. आयआयटीमध्ये प्रवेश घेईन पर्यंत मेहुल ने छोटे ड्रोन मशीन, ईव्ही कार चे री मॉडेलिंग, स्वतःचा एक रोबोट देखील त्याने बनवला. त्याने बनवलेला हा रोबोट चक्क शाळेमध्ये नाचायचा. एवढेच नाही तर त्याने जमिनीवर कोणतेही अडथळे आले तर त्या अडथळ्यांना दूर करणारी छोटी कार देखील बनवली होती. मेहुल ने आंतरराष्ट्रीय ओलंपियाड परीक्षा देखील दिली आहे. मेहुल चे स्वप्न हे शास्त्रज्ञ बनण्याचं आहे. मेहुल रहात असलेल्या हॉस्टेलच्या खोलीमध्ये पूर्णपणे भंगार जमा करून सजवल्याचे दिसते.

लहानपणापासून मशीनबाबत कुतूहल- (Car Operate On Fingers)

मेहुल बोराडच्या पालकांनी लहानपणापासूनच भौतिक शास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये त्याचा वाढता कल पाहून त्याला प्रोत्साहन दिले. याबाबत मेहुल सांगतो की, लहान असताना कोणत्याही मशीनचे आकर्षण असल्यामुळे हे मशीन कशा पद्धतीने काम करते, ही कोणती यंत्रणा आहे, हे पाहण्याचा छंद लागला होता. दुसरी मध्ये असताना एक छोटी मोटर आणि पेपर प्लेट्स आणि काही बॅटरी घेऊन एक छोटा पंखा तयार केला होता. तेव्हापासून घरच्यांनी पण अशा यंत्रांच्या सोबत काम करण्याचे प्रोत्साहन दिले.

मेहुल बोराड सध्या बोटांच्या इशाऱ्यावर चालणारी कार बनवली (Car Operate On Fingers) असून यामध्ये त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केल्याचं सांगितलं. भारतात बऱ्याच वैद्यकीय चाचण्या या लाखो रुपयांच्या असतात. या चाचण्या फक्त काही रुपयांमध्ये झाल्या पाहिजे असं मेहुलचं स्वप्न आहे. हे देखील आर्टिफिशियल इंटेलिजंट ने शक्य असल्याचं त्याने सांगितलं.