Cars Launched In December : डिसेंबर महिन्यात लॉन्च होतील ‘या’ 3 नवीन कार

Cars Launched In December : भारतीय बाजारपेठेत बऱ्याच कार, टू व्हीलर स्कूटर पेट्रोल डिझेल वाहन इलेक्ट्रिक वाहन लॉन्च होत असतात. यंदा देखील बऱ्यापैकी प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले होते. आता 2023  हे वर्ष संपण्यापूर्वी  डिसेंबर महिन्यात आणखीन ३ कार लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये सुपरकार लेम्बोर्गिनी चा देखील समावेश होतो. एवढेच नाही तर Tata Punch EV, Kia Sonet SUV या कार देखील वर्षाच्या अखेरीस लॉन्च करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या कारच्या किमती आणि फीचर.

   
TG LAMBO230309 0013

१) लेम्बोर्गिनी रेव्यूल्टो Lamborghini Revuelto-

ही कार आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2023 च्या सुरुवातीलाच लॉन्च करण्यात आली होती. आता सहा डिसेंबरला ही कार भारतीय मार्केटमध्ये लॉन्च (Cars Launched In December) करण्यात येणार आहे. लेम्बोर्गिनी रेव्यूल्टो ही कार एवेंटाडोर ला रिप्लेस करेल. ही पहिली लेम्बोर्गिनी सुपरकार असेल ज्यामध्ये इलेक्ट्रिफाईट पॉवरट्रेन मिळेल. त्यानुसार या कारमध्ये 6.5 लिटर नॅचरली अस्पिरिटेड V12 पेट्रोल इंजिन सह तीन इलेक्ट्रिक मोटर देण्यात येतील. ही इलेक्ट्रिक मोटर 1015 ps पावर प्रदान करेल. या इंजिन सोबत 8 स्पीड डीसीटी म्हणजेच ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स आणि ऑल व्हील ड्राईव्हट्रेन AWD मिळेल.

लेम्बोर्गिनी  रेव्यूल्टो या सुपरकारच्या केबिनमध्ये तीन स्क्रीन देण्यात येतील. त्यानुसार 12.3 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 8.4 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅसेंजर साठी 9.1 इंच स्क्रीन देण्यात येईल. या सुपर कार मध्ये ऍडव्हान्स ड्राईव्ह असिस्ट सिस्टीम ADAS मिळेल. या सुपर कार ची किंमत 8 करोड रुपये असू शकते.

New Kia Sonet

२) New Kia Sonet – Cars Launched In December

2020 मध्ये लॉन्च करण्यात आलेली Kia Sonet SUV मध्ये पहिल्यांदा नवीन मीड लाइफ अपडेट देण्यात येत आहे. या अपडेटेड SUV ला बऱ्याचदा टेस्टिंग वेळी पाहण्यात आले आहे. ही कार 14 डिसेंबरला भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीकडून या एन्ट्री लेवल SUV कार मध्ये एक्स्टेरियल आणि इंटरनली बरेच नवीन डिझाईन अपडेट मिळतील. ही कार 8 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च होऊ शकते.

नवीन किआ सोनेट या अपडेटेड कार मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360 डिग्री कॅमेरा, ॲडव्हान्स ड्राइवर असिस्टंट सिस्टीम ADAS यासारखे फीचर्स मिळतील. त्याचबरोबर या नवीन किआ सोनेट कार मध्ये सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या मॉडेल मध्ये असलेले पेट्रोल आणि डिझेल इंजिन यासह गिअरबॉक्स ऑप्शन मिळेल.

tata punch ev

३) Tata Punch EV –

टाटा पंच कंपनीची ही ICE पावर्ड कार इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. या कारच्या लॉन्चिंग डेट बद्दल अजून खुलासा करण्यात आलेला नसून ही कार 12 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च होऊ शकते. या इलेक्ट्रिक कारच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये बरेच कॉस्मेटिक बदल करण्यात येतील. यामध्ये टाटा नेक्सन ईव्ही प्रमाणे  नवीन स्टाईल अपडेट्स बघायला मिळू शकतात. या अपकमिंग इलेक्ट्रिक टाटा पंचच्या इलेक्ट्रिक पॉवरट्रेन बद्दल अजून कोणतेच डिटेल्स हाती आले नाही. मात्र ही अपकमिंग कार 500 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज देऊ शकते. या इलेक्ट्रिक कार मध्ये मोठी टचस्क्रीन, 360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅक्स यासारखे फीचर्स मिळतील.