Cars Under 7 Lakhs : 7 लाखांच्या आत खरेदी करा ‘या’ दमदार Car; पहा मायलेजसह संपूर्ण माहिती

Cars Under 7 Lakhs । आजकाल कार खरेदीसाठी कोणताही मुहूर्त बघितला जात नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये बऱ्याच नवीन कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. तुम्हाला देखील नवीन कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्ही खरेदी करू शकत नसाल तर आम्ही आज तुम्हाला 7 लाखांच्या आत मिळतील अशा स्वस्तात मस्त गाड्यांबद्दल सांगणार आहोत. मग तुम्हीच ठरवा कोणती गाडी तुमच्यासाठी योग्य ठरेल.

   
Maruti Suzuki Baleno

मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno)

या लिस्टमधील सर्वात पहिली कार (Cars Under 7 Lakhs) म्हणजे मारुती सुझुकी बलेनो. ही कार 9 व्हेरीएंट आणि ७ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. या कारच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर तुम्हीही कार 6.61 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. या कार मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 90 PS पावर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी बलेनो या कारच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर ही कार 22.35 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते.

Tata Punch

टाटा पंच (Tata Punch) – Cars Under 7 Lakhs

या लिस्टमधील दुसऱ्या नंबरची कार म्हणजे टाटा पंच. TATA punch या कार मध्ये 1.2 लिटर 3 सिलेंडर इंजन वापरले असून हे इंजन पेट्रोल वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिनसह हे इंजिन 86 एचपी पॉवर आणि 117 nm टॉर्क जनरेट करते. तसेच या कारच्या सीएनजी मोड मध्ये 73.4 hp पॉवर आणि 103 nm टॉर्क जनरेट करते. या कारला फक्त 5 स्पीड मॅन्युअल गिअर देण्यात आलेले आहे. नुकतेच आता कंपनीने सीएनजी एसयुव्हीची रेस परफेक्ट बनवण्यासाठी नवीन टाटा पंच सीएनजी मध्ये लॉन्च केली आहे. TATA punch हे टाटा मोटर्सचे चौथे सीएनजी मॉडेल असणार आहे. ही कार 20.09 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. पेट्रोल इंजन असलेल्या टाटा पंचची किंमत 6 लाख रुपये एवढी आहे.

Maruti Swift

मारुती स्विफ्ट (Maruti Swift)

मारुती स्विफ्ट या कार मध्ये 1.2 L 4 सिलेंडर नॅचरल गॅस इंजिन देण्यात आले आहे. या कारची इंधन टाकी क्षमता 37 ते 55 लिटर एवढी आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करू इच्छित असाल तर या कारची किंमत 5.99 लाख रुपये (Cars Under 7 Lakhs) एवढी आहे. या कारमध्ये देण्यात आलेले इंजन 90 पीएस पावर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच सीएनजी व्हेरीएंटमध्ये हे इंजिन 77.5 पी एस पावर आणि 98.5 NM पीक टॉर्क जनरेट करते. या कार मध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

new dzire colour gallant red

मारुती डिझायर (Maruti Dzire)

या कारची किंमत 6.51 लाख रुपये एवढी आहे. या कारमध्ये देण्यात आलेल्या इंधन टाकीची क्षमता 37- 55 L एवढी आहे. ही कार 22.41 ते 31.12 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. या कारमध्ये 1197 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 90 पीएस पावर प्रदान करते. आणि 113 एन एम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत उपलब्ध आहे. यासोबतच मारुती डिझायर सीएनजी व्हेरीएंट मध्ये 77PS/98.5 NM पीक टॉक जनरेट करते.

Altroz

अल्ट्रोज (Altroz)

टाटा कंपनीच्या अल्टोज कारची किंमत 6.60 लाख रुपये एवढी आहे. यामध्ये 16 इंच अलॉय व्हिल्स, एलइडी डीआरएलएस , डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखे की फीचर्स देण्यात आले आहे. या कार मध्ये 1.2 लिटर नॅचरल एक्स्पिरिटेड पेट्रोल, 1.2 लिटर टर्बो पेट्रोल , 1.5 लिटर डिझेल हे तीन इंजिन व्हेरीएंट उपलब्ध आहे. या तिन्ही इंजनला स्टॅंडर्ड 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. यासोबतच नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजन सोबत 6 स्पीड क्लर्च ट्रान्समिशन देण्यात आले आहे.