Cars Under 8 Lakhs । भारतीय बाजारपेठेमध्ये परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेल्या कारला ग्राहकांची मोठी मागणी असते. बजेट मध्ये परवडणाऱ्या आणि प्रवासासाठी योग्य वाटणाऱ्या गाड्या ग्राहक घेत असतात. आता लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. त्यानिमित्त तुम्हीही नवी गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुमच्या साठी 8 लाखांच्या बजेटमध्ये असणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या Maruti आणि Hyundai च्या 2 कार बाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया नेमक्या कोणत्या आहेत या गाड्या….
Maruti Fronx
Maruti Fronx ही देशातील सर्वात मोठ्या कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीची कार आहे. या कार मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 100 bhp पावर आणि 98.5 nM पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत सहा स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. या कारची किंमत 7.46 लाख रुपये (Cars Under 8 Lakhs) एवढी आहे.

Maruti Fronx ही पाच सीटर कार असून ही कार CNG वर्जन देखील उपलब्ध आहे. CNG व्हर्जन मध्ये ही कार 28.52 किलोमीटर प्रति किलोग्राम एवढे मायलेज देते. यामध्ये हेड्स अप डिस्प्ले देण्यात आला आहे. या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा उपलब्ध आहे.तसेच वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कारप्ले देखील उपलब्ध आहे. मारुतीच्या या कारमध्ये 9 इंच स्मार्ट प्ले इम्पॉर्टंट सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर सेफ्टी साठी एअरबॅग यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहेत.
Hyundai Venue– Cars Under 8 Lakhs
Hyundai Venue ह्युंदाई कंपनीच्या या कारमध्ये टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम ADAS सिस्टीम देण्यात आली आहे. या कारमध्ये 998 Cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 1.2 लिटर पेट्रोल वर्जन सह उपलब्ध आहे. हे इंजिन 83 PS पावर आणि 114 NM पीक टॉर्क जनरेट करते. या कार मध्ये ऑटोमॅटिक एसी आणि पावर ड्राइवर सीट उपलब्ध करण्यात आली आहे. ही कार मॅक्झिमम 23.4 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. मार्केट मध्ये Hyundai Venue ची किंमत 7.77 लाख रुपये एवढी आहे.

Hyundai Venue या कारमध्ये 8 इंच चा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबतच कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, अलेक्सा, google व्हॉइस असिस्टंट, एयर प्युरिफायर, 4 वे पॉवर ड्रायव्हर, सनरुफ, ऑटो एसी, पुश बटन स्टार्ट- स्टॉप, कुल्ड ग्लवबॉक्स आणि वायरलेस फोन चार्जिंग यासारखे फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहे. सेफ्टी साठी यामध्ये 6 एअरबॅग देखील उपलब्ध आहे.