Cars With Biggest Boot Space : या 3 Car मध्ये मिळतेय मोठी बूट स्पेस; लांबच्या प्रवासासाठी ठरतील बेस्ट

Cars With Biggest Boot Space : प्रवास करणे हे प्रत्येकाला आवडत असतं. आपण शक्यतो एकटाच जाऊन कुठे फिरत बसत नाही. एक तर आपल्यासोबत आपली मित्रमंडळी असते किंवा आपलं कुटुंब असते. अशावेळी जास्त लोक असल्याने प्रवास करताना कार मध्ये सामान ठेवण्यासाठी जास्त बूट स्पेसची गरज असते. जेणेकरून सामान व्यवस्थित ठेवता येईल आणि प्रवासाचा मनसोक्त आनंदही घेता येईल. तुम्हाला सुद्धा जर प्रवास आवडत असेल आणि त्यासाठी जास्त बूट स्पेस असलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल  तर आम्ही तुम्हाला आज अशा काही गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये अप्रतिम बूट्स स्पेस मिळते.

   
front left side 47 6

१) Maruti Suzuki Ciaz-

Maruti Suzuki Ciaz या कारमध्ये  1.5 लिटर  K सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103  BHP पावर आणि 138  NM पिक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये माइल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी उपलब्ध आलेली असून  या कारच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर  या गाडीचे मायलेज 22 किलोमीटर प्रति लिटर एवढे आहे. या कार मध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि चार स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देण्यात आले आहे. MARUTI SUZUKI CIAZ या कारमध्ये 510 लिटर बूट स्पेस (Cars With Biggest Boot Space) उपलब्ध आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत  9.30 लाख ते 12.45 रुपये एवढी आहे.

Hyundai Verna

२) Hyundai Verna- Cars With Biggest Boot Space

Hyundai कंपनीच्या या कारमध्ये  ADAS सिस्टीम वापरण्यात आली आहे. यामध्ये रडार फ्रंट आणि बॅक, सेन्सर आणि कॅमेरा यासारखे फीचर्स उपलब्ध आहे. या फीचर्स च्या माध्यमातून रस्त्यावर काही समस्या असल्यास ड्रायव्हरला अलर्ट केले जाते. एवढेच नाही तर स्वतः कार कंट्रोल करण्यामध्ये देखील हे सक्षम असेल. यासोबतच फॉरवर्ड कॉलिजन अवायडेंस असिस्ट हे गाड्यांची टक्कर होण्यापासून थांबवेल.  फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग FCW , फॉरवर्ड कॉलिजन रेस्क्यू असिस्ट कार FCA , फॉरवर्ड कॉलिजन असिस्ट, पादचारी फॉरवर्ड कॉलिजन असिस्ट, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग LDW, ड्रायव्हर अटेंशन वार्निंग DAW या सर्व फीचर्स चा वापर होतो. त्याचबरोबर या कार मध्ये 528 लिटरचा बूट स्पेस (Cars With Biggest Boot Space) उपलब्ध करण्यात आला आहे.  या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 10.96 लाख रुपये आहे.

Honda Elevate Price

३) Honda Elevate-

Honda Elevate या SUV मध्ये चार वेगवेगळे व्हेरिएंट उपलब्ध आहे. यामध्ये SV, V, VX, आणि ZX हे चार व्हेरिएंट चा समावेश आहे. Honda Elevate SUV ची सुरुवातीची किंमत 11 लाख रुपयांपासून पुढे आहे. आणि पेट्रोल सीबीटी कॉम्बोसह टॉप वेरिएंट ZX ची किंमत 16 लाख रुपयांपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता. ही कंपनीची मिड साइज SUV असून यामध्ये 458 लिटर बुट स्पेस उपलब्ध आहे.