सिलिंग फॅन ची साफसफाई करण्यासाठी वापरा ‘या’ घरगुती Tricks

टाइम्स मराठी । घराला थंड करण्यासाठी आपण सर्व रूम मध्ये सिलिंग फॅन लावत असतो. त्याचबरोबर हा सिलिंग फॅन सतत सुरू असल्यामुळे फॅन च्या पात्यांवर धूळ जमा होते. जर तुम्ही वेळेवर हे साफ न केल्यास मोठ्या प्रमाणात जाळं आणि धूळ जमा होण्याचे चान्सेस वाढतात. आपण घराची साफसफाई करताना फॅन कडे लक्ष देण्याचं बर्‍याचदा विसरून जातो. त्यामुळे फॅन वर सतत धूळ जमा झाल्यामुळे घर साफ दिसत नाही. परंतु हा सिलिंग फॅन साफ करणे अत्यंत कठीण असून त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा वापर करून सिलिंग फॅन साफ करावा लागेल.

   

सिलिंग फॅन साफ करण्यासाठी त्यांचे पाते आपण रगडून साफ करू शकत नाही. त्यासाठी काही पद्धती वापराव्या लागतील. जर तुम्ही फॅन पर्यंत पोहोचू शकत असाल तर सर्वात अगोदर कोरड्या कपड्याने फॅन वरची घाण पुसून घ्या. याशिवाय तुम्ही एका काडीला कपडा गुंडाळून त्यांची साफसफाई करू शकतात.

तकिया कव्हर

सिलिंग फॅन ची साफसफाई करण्यासाठी तुम्ही तकिया कव्हर देखील वापरू शकतात. ही पद्धत नवीन असून या पद्धतीमुळे सिलिंग फॅन ची चांगली साफसफाई होऊ शकते. तकीयाच्या कव्हर ने साफसफाई करण्यासाठी सर्वात अगोदर फॅन च्या एका पात्याला तकिया कवर घाला. त्यानंतर कव्हर्स तोंड बंद करून हातांनी स्वाईप करा. ज्यामुळे पंख्याच्या पात्यांना असलेली घाण पूर्णपणे साफ होईल.

कोबवेब ब्रश

सिलिंग फॅन ची साफसफाई करण्यासाठी तुम्ही कोबवेब ब्रश देखील वापरू शकतात. यासाठी तुम्हाला हा ब्रश घेऊन फॅनच्या पात्यांवर स्वाईप करावा लागेल. यामुळे पात्यावर बसलेली धूळ निघून जाईल.

सॉक्स

तुमच्या घरात जर जुने पुराने सॉक्स असतील तर त्याचा वापर करून देखील तुम्ही सिलिंग फॅन साफ करू शकतात. यासाठी सर्वात अगोदर सॉक्स ओला करा. त्यानंतर तो सॉक्स पंख्याच्या पात्यांना घालून हाताने स्वाईप करा. यामुळे पात्यांवरची घाण सॉक्सला लागून बाहेर येईल.

व्हॅक्युम क्लिनर

आपण घरातील कानाकोपऱ्यातील धूळ साफ करण्यासाठी व्हॅक्युम क्लिनरचा वापर करत असतो. त्याच प्रकारे आपण सिलिंग फॅन साफ करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतो. या पद्धतीने काही वेळातच घाण पूर्णपणे निघून जाऊ शकते.