Chanakya Niti : बुद्धिमान व्यक्तीने कधीही करू नयेत या गोष्टी; पहा काय सांगतात चाणक्य

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांचे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये मनुष्याला जीवन कसे जगावे? यशस्वी होण्यासाठी काय करावे? आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केला आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही नीती जर दैनंदिन जीवनामध्ये पाळल्या तर कोणताही व्यक्ती येणाऱ्या अडचणी आणि संकटांवर मात करू शकतो. त्यानुसार आचार्य चाणक्य यांनी बुद्धिमान व्यक्तींच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. यासोबतच चाणक्य यांनी बुद्धिमान व्यक्तीने कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे देखील नीतिशास्र मध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर जाणून घेऊयात.

   

उपाशी राहू नये

आचार्य चाणक्य सांगतात की, बुद्धिमान व्यक्तीने कधीच उपाशी राहू नये. उपाशी राहिल्यामुळे बुद्धीचा नाश होतो. यासोबतच विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील कमी होते. त्यामुळे कोणाचाही आणि कसलाही राग अन्नावर काढू नये. आणि कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये अन्नाचा त्याग करू नये. कारण यामुळे आपल्याला आलेल्या अडचणींवर उत्तर मिळत नाही. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागतो. यासाठी पोटात अन्न असणे देखील गरजेचे आहे.

यशस्वी होण्यासाठी वापरा हा मंत्र

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चाणक्य नीति तुम्हाला आचरणात आणावी लागेल. यामुळे तुमचे आयुष्य प्रगतिशील होईल. आजारी जानके यांच्यामध्ये कर्म आणि ज्ञान कोणत्याही व्यक्तीला बुद्धिमान बनवू शकतो. त्यामुळे सतत ज्ञान घेत रहा  जेणेकरून तुम्ही लवकरच यशस्वी होऊ शकतात. आणि तुम्हाला बुद्धिमान बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

कमजोर मित्रांपासून रहा लांब

आचार्य चाणक्य म्हणतात की, शक्तिवाण शत्रू आणि कमजोर मित्रासोबत कधीच मैत्री करू नये. कारण कमजोर मित्रामुळे देखील तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे मैत्री करत असताना तुमच्या लेव्हलचा विचार करून करणे गरजेचे आहे. यासोबतच शक्तिमान शत्रू सोबत प्रतिस्पर्धा करणे योग्य आहे. हा शत्रू देखील तुम्हाला मोठ्या अडचणींमध्ये टाकू शकतो. त्यामुळे कधीही शक्तिमान शत्रू आणि कमजोर मित्रापासून लांब रहा.

सत्याची बाजू घ्या

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, बुद्धिमान व्यक्तींनी कधीही सत्याची बाजू घेतली पाहिजे. त्यानुसार तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा. ज्यामुळे तुम्ही न घाबरता तुमची बाजू मांडू शकाल. जर आपण खरे असू तर आपल्याला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागत नाही.