Chanakya Niti : हे गुण असणारी मुले करतात आई- वडिलांचा उद्धार

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र आपल्या सर्वांच्या ओळखीतील संग्रह आहे. आपल्या चाणक्य नीती मध्ये (Chanakya Niti) माणसाने कसे जगावे इथपासून ते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं याबाबत मार्गदर्शन केलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांचा उद्धार करण्यासाठी मुलांच्या अंगी कोणते गन असावे याबाबत सुद्धा चाणक्य यांनी सांगितलं आहे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, पाल्यामध्ये बरेच गुण असणे गरजेचे आहे. या गुणांमधून संस्कार, वागणूक समजत असते. यासोबतच पाल्यांमुळे माता पितांना देखील ओळखले जाते. त्यानुसार आज आपण पाल्यांमध्ये कोणते गुण असणे गरजेचे आहे हे जाणून घेणार आहोत.

   

कुटुंबातील सर्व सदस्यांचा मानसन्मान करणे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, (Chanakya Niti) चांगली मुले किंवा चांगले पाल्य यांचे संस्कार लगेच समजत असतात. जेव्हा पाल्य परिवारातील सर्व सदस्यांसोबत किंवा दुसऱ्या व्यक्तींसोबत नम्रतेने व्यवहार आणि भाष्य करतात तेव्हा त्यांच्यातील संस्कार बोलत असतात. जे पाल्य समोरच्या व्यक्तीचे ऐकतात, समजून घेतात आणि मग बोलतात ते पाल्य चांगली असतात. कुटुंबातील सर्व सदस्यांचा आदर मान सन्मान करणारी मुले मिळण्यासाठी देखील भाग्य लागते. एवढेच नाही तर पाल्याला शिक्षणाचे महत्व असेल तर अशा मुलांवर सरस्वती आणि लक्ष्मी माता यांची कृपा असते.

आज्ञाधारी मुले – Chanakya Niti

संस्कारी सुशील आज्ञाधारी मुले माता पितांना सुख समृद्धी देतात. अशी मुले समाजामध्ये माता- पितांचा उद्धार करतात. त्यांना सन्मान प्राप्त करतात. जर पाल्य ज्ञानधारक असेल तर ते मेहनत करून यशस्वी होतात. आणि या पाल्यांच्या नावानेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य ओळखले जातात.

कठोर शब्दात उत्तर देऊ नये

मुलांनी कधीच माता-पितांना कठोर शब्दांमध्ये उत्तर देऊ नये. अशामुळे माता-पितांना त्रास होतो. पाल्यांची वाणी कधीही मधुर असली पाहिजे. आपल्या मधुर वाणीने शत्रूचेच नाही तर संपूर्ण जगाचे मन जिंकता येत असते. त्यानुसार आपल्या वाणीने आपण शत्रूचेही मित्र बनू शकतो. आणि सर्वांना मधुर वाणीने जिंकू देखील शकतो. यातून माता-पितांचे संस्कार दिसत असतात.