Chanakya Niti : आयुष्यात ‘या’ 2 चुका पडू शकतात महागात; देवही माफ करणार नाही

टाइम्स मराठी । भारतातील महान अर्थशास्त्रज्ञ आणि राजनीति शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे विष्णुपंत शिरोमणी म्हणजेच आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये (Chanakya Niti) अनेक मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. चाणक्य नीति मध्ये जीवनात येणाऱ्या अडचणींना कशा पद्धतीने सामोरे जायचे हे सांगितले आहे. यासोबतच आयुष्यात यशस्वी होण्यासाठीच्या काही नीती, कुटुंबासोबतच वैवाहिक जीवनात सुख शांती लाभण्यासाठी गरजेच्या गोष्टींबद्दल देखील भाष्य करण्यात आले आहे. आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति आचरणात आणल्यास जीवनातील संकटांवर मात करण्याची ताकद मिळते.

   

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते नात्यांमध्ये यासोबतच मित्रपरिवार समाजामध्ये सुख शांती मिळवण्यासाठी संबंध मजबूत बनवणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याचदा अतूट संबंध बनवण्यासाठी खोट्याची बाजू घ्यावी लागते. किंवा कधीतरी खोटे बोलावे लागते. परंतु आचार्य चाणक्य सांगतात की, असे काही कार्य आहेत जे केल्यामुळे पाप लागू शकते. आणि या चुका केल्यामुळे देव देखील माफ करत नाही. जाणून घेऊया कोणत्या आहेत या चुका.

आई-वडिलांचा अपमान करू नये

आई-वडिलांना त्यांच्या मुलांचं यश हे सर्वात महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आई वडील हे सतत मुलांच्या भल्याचा विचार करत असतात. आपली मुले सतत खुश राहावे असं त्यांना वाटतं. मुलांनी आई वडिलांचे नाव मोठे करावे हे प्रत्येक आई-वडिलांचे मोठे स्वप्न असते. त्यासाठी मुलांना योग्य ते मार्गदर्शन आई-वडील करत असतात. परंतु कालांतराने मोठे झाल्यावर मुलं आई-वडिलांना विसरतात. त्यांना दुखावतात. आई-वडिलांना दुखावणं हे सर्वात मोठे पाप आहे. हे पाप केल्यास देव सुद्धा कोणालाच माफ करत नाही.

शब्द जपून वापरा– Chanakya Niti

शब्दांना तलवारीपेक्षा जास्त धार असते असं म्हणतात. कारण शब्द हे मनावर वार करतात. यासोबतच प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यातून आणि शब्दातून  त्यांची वागणूक आणि व्यवहार समजत असतो. जे व्यक्ती अपशब्द वापरतात, उद्धट शब्दांचा वापर करतात असे व्यक्ती प्रत्येकाला दुखवत असतात. त्यामुळे कधीही बोलताना शब्द जपून वापरा. शब्दांवर काबू ठेवणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही बोलत असलेले शब्द तुमची वाणी ही मधुर असणे गरजेचे आहे. यासोबतच कोणत्याही व्यक्तीसोबत तुमचा व्यवहार देखील चांगला असणे गरजेचे आहे. जे व्यक्ती उद्धट बोलतात, इतरांना दुखावतात  त्यांना कधीच देव माफ करत नाही.