टाइम्स मराठी । मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सर्वचजण चाणक्यनीतीचे (Chanakya Niti) पालन करताना दिसतात. आचार्य चाणक्य यांनी केलेल्या लिखाणामध्ये वेगवेगळे संग्रह उपलब्ध आहे. त्यापैकी नीतीशास्त्र हे आपल्या सर्वांना माहिती असेल. नीतीशास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्याच्या रुपयांपासून जीवन कसे जगावे हे देखील सांगितले आहे. एवढेच नाही तर जीवन जगताना कशाप्रकारे जगले पाहिजे कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे देखील ते आपल्याला सांगतात. यानुसार वैवाहिक जीवनात सतत भांडण होत असतील तर यासाठीचे उपाय देखील चाणक्य सांगतात त्यामुळे आपले वैवाहिक जीवन देखील सुखरूप राहते.
जीवनात अनेक समस्या टाळण्यासाठी बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवणे गरजेचे आहे. बऱ्याच व्यक्तींच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही. म्हणजेच त्या व्यक्ती त्यांच्या पोटात कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाहीत. परंतु हे अत्यंत चुकीचे असून यामुळे प्रचंड प्रॉब्लेम होऊ शकतात. तुमच्या गुप्त गोष्टी कोणाला सांगितल्यामुळे तुम्हाला त्याची होणारी दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे काही गोष्टी नेहमी तुम्ही स्वतः च्या मनात ठेवल्या पाहिजे.
कुटुंबातील व्यक्तींबाबत बाहेरच्या लोकांना काही सांगू नका –
बऱ्याच लोकांना आपल्या कुटुंबांमधील सर्व गोष्टी मित्र नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांसोबत शेअर करायला आवडतात. परंतु त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये परस्पर दुरावा आणि अविश्वासाची भावना निर्माण होते. त्याचबरोबर घरातील गोष्टी घरातच राहिल्या तर तुमचे जीवन आनंदी होऊ शकते. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या काही समस्या किंवा कमतरता असतील त्या कोणासमोरच सांगू नका. कारण यामुळे कुटुंबाची मानहानी होते. यामुळे तुमचे नाती देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे कुटुंब मधील कोणत्याच गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना किंवा मित्रांना, नातेवाईकांना सांगू नका.
अपमान झाल्यास लोकांना सांगू नका– (Chanakya Niti)
जर एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला असेल तर ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगत फिरू नका. ही गोष्ट तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवा. कारण यामुळे इतरांच्या मनातील तुमचा आदर कमी होऊ शकतो. बऱ्याचदा तुमचा झालेला अपमान एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगितला तर त्या व्यक्ती देखील तुमचा अपमान करतील. आणि तुमच्याबद्दल कधीच कोणी सहानुभूती दाखवणार नाही. एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केल्यास आपण ती गोष्ट जास्त वेळ मनात धरून ठेवतो. परंतु हे अत्यंत चुकीचे असून जास्त वेळ कोणतीच गोष्ट मनात ठेवू नका.
आजार औषधांबद्दल लोकांना सांगू नका
औषधांबद्दल आणि आजाराबद्दल एखाद्या व्यक्तीला सांगणे हे देखील चुकीचे आहे. तुमचे औषध आणि आजार एखाद्या व्यक्तीसमोर उघड झाल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्याच आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला काय होत आहे हे कधीच कोणालाच सांगू नका.
तुमची कमाई लोकांना सांगू नका
प्रत्येक व्यक्ती जीवनात पैसा कमावण्यासाठी धडपडत असतो. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला समोरचा व्यक्ती किती पैसे कमवतो यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही एखाद्या व्यक्तीला न सांगितल्यास ते दुसऱ्या मार्गांनी अंदाज लावू शकतात. तरीही आपण किती पैसे कमवतो हे शक्य तेवढे गोपनीय ठेवणे गरजेचे आहे.
वैवाहिक जीवनातील गोष्टी लोकांना सांगू नका
वैवाहिक जीवनात पती-पत्नी एकमेकांना संपूर्ण गोष्टी शेअर करतात. परंतु आपल्या लाईफ पार्टनर बद्दलच्या कोणत्याच खासगी गोष्टी लोकांना सांगू नका. त्याचबरोबर बऱ्याचदा पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर याबाबत बाहेरच्या व्यक्तींना म्हणजेच लोकांना सांगू नका. भांडण तेवढ्यापुरता तिथेच मिटवून टाका. लोकांना या गोष्टी समजल्यानंतर ते तुमची मजाक उडवतील. यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो असे चाणक्य नीती (Chanakya Niti) मध्ये म्हंटल आहे.