Chanakya Niti : ‘या’ 4 व्यक्तींसोबत राहणं तुम्हाला ठरेल नुकसानकारक

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति (Chanakya Niti) प्रत्येक वळणावर मदत करते. छोट्यां पासून जेष्ठ व्यक्ती पर्यंत सर्वांना चाणक्य नीति ही मार्ग दाखवत असते. त्यांनी सांगितलेल्या नितीचे पालन केल्यास  सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करता येते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या संग्रहामध्ये, जीवनात येणाऱ्या अडचणींवर भाष्य केले आहे. त्यानुसार चाणक्य नीति आचरणात आणल्यास आपल्या जीवनातील संकटांचा सामना आपण करू शकतो.

   

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) म्हणतात की, जीवनात प्रत्येक व्यक्तीला मदत करायला हवी. परंतु बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली तर आपण स्वतः अडचणीमध्ये येऊ शकतो. त्यामुळे काही व्यक्तींपासून लांब राहणे देखील गरजेचे आहे. जेणेकरून कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. चाणक्य यांनी काळ, वेळ, परिस्थिती आणि धर्म या गोष्टींचा विचार करूनच भाष्य केले आहे. जाणून घेऊया कोणत्या चार व्यक्ती पासून दूर राहणे गरजेचे आहे.

1) मूर्ख व्यक्तीना समजून सांगणे व्यर्थ

आचार्य चाणक्य यांनी नीती मध्ये मूर्ख व्यक्तींपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. मूर्ख व्यक्तींना कितीही मदत केली किंवा कितीही समजावून सांगितले तरी देखील त्याचा परिणाम होत नाही. कारण मूर्ख व्यक्ती स्वतःला वाटेल तेच करत असतात. अशा व्यक्तींना समजून सांगणे म्हणजेच स्वतःचा वेळ वाया घालवणे आहे. जे व्यक्ती अशा मूर्ख व्यक्तींना समजून सांगण्यामध्ये वेळ घालवतात  ते सतत अडचणीतून जातात.

२) स्वार्थी महिलांपासून लांब राहणे योग्य– Chanakya Niti

आचार्य चाणक्य नीतीनुसार, स्वतःचा विचार करणाऱ्या स्वार्थी महिलांपासून दूर राहणे गरजेचे आहे. जी महिला स्वतःचं खरं करत असेल, ज्या महिलेला दुसऱ्यांची काळजी नसेल, दुसऱ्यांचा ऐकत नसेल अशा स्वार्थी महिलेपासून लांब राहणे गरजेचे आहे. जी महिला पती,  मुलगा, आई, वडील, यांचा विचार करत नाही, अशा महिलेला कोणतीही गोष्ट समजून सांगणे आणि अशा महिलेसोबत राहणे व्यर्थ आहे. अशा महिलांमुळे चांगल्या व्यक्तींना नुकसान भोगावे लागते.

३) लालची व्यक्ती पासून लांब रहा

आचार्य चाणक्य नीति (Chanakya Niti) सांगते की, लालची, पैशांच्या मागे फिरणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहिले पाहिजे. लालची व्यक्ती कधीही पैसा कसा येईल याचा विचार करत असतो. एखाद्या व्यक्तीला गरज असेल तेव्हा असे व्यक्ती पैशांची मदत करत नाही. हे व्यक्ती सतत अडचणींमध्ये असतात. यासोबतच लालची आणि कंजूस व्यक्तीसोबत राहिल्यामुळे आणि त्यांच्यावर अफाट खर्च केल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

४) नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून राहा लांब

जे व्यक्ती सतत नकारात्मक विचार करतात ते व्यक्ती सतत दुसऱ्यांना अडचणीत टाकत असतात. त्याचबरोबर हे नकारात्मक विचार करणारे व्यक्ती इतरांना सतत त्यांच्या प्रॉब्लेम्स बद्दल सांगतात. नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत राहिल्यामुळे दुसरे व्यक्ती देखील नकारात्मक विचार करायला लागतात. त्यांचा संपूर्ण दिवस नकारात्मक जातो. त्यामुळे कधीच नकारात्मक व्यक्तीसोबत राहू नका.