टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचं लिखाण आणि संग्रह मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या संग्रहापैकी एक म्हणजे चाणक्य नीति (Chanakya Niti) . चाणक्य नीति आपल्या जीवनामध्ये प्रचंड उपयोगी पडते. आचार्य चाणक्य यांनी लिखाण केलेल्या चाणक्य नीतिचा फायदा प्रत्येक वयोगटातील मुलांना, व्यक्तींना, वृद्धांना होत असतो. नितीनियमांचे पालन करून कोणतीही व्यक्ती गरिबीतून श्रीमंतीत येऊ शकतो. आणि यश मिळवू शकतो. या सोबतच आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीति मध्ये वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी कसे जगावे हे देखील त्यांनी सांगितले आहे.
चाणक्यनीति मध्ये (Chanakya Niti) काही गोष्टींचा विचार करून, एखादा व्यक्ती कशाप्रकारे आपल्या परिवारामध्ये सुख शांती आणू शकतो. हे सांगितले आहे. चाणक्य यांच्या मते काही गोष्टी इतरांना सांगणे अयोग्य असून घरातल्या गोष्टी घरातच राहणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरून एखाद्या व्यक्तीला कोणत्याच परिवारा संबंधीत समस्येचा सामना करावा लागणार नाही. जर एखादा व्यक्ती घरातील काही प्रॉब्लेम्सवर किंवा घरातील काही गोष्टींवर बाहेर चर्चा करत असेल किंवा कोणाला सांगत असेल तर यामध्ये त्या व्यक्तीचेच नुकसान आहे. त्यामुळे घरातील कोणत्याच गोष्टी बाहेर सांगणे टाळले पाहिजे. अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत जे बाहेर सांगणं बरोबर नाही हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
आर्थिक बाबींबद्दल बाहेर बोलू नका
आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते, कधीच आर्थिक बाबींसोबत जोडल्या गेलेल्या गोष्टी इतरांना सांगू नका. तुम्ही कितीही पैसे कमवत असाल, किंवा कितीही मोठ्या संपत्तीचे मालक असाल तरीही एखाद्या व्यक्तीला तुमचा पैसा, तुमची संपत्ती या गोष्टी सांगणे टाळले पाहिजे. बऱ्याचदा आपण ज्या व्यक्तीला आपल्या संपत्ती बद्दल सांगत आहोत तो व्यक्ती प्रचंड गरीब किंवा तो आर्थिक परिस्थितीशी झुंज देत असेल तर अशावेळी त्या व्यक्तीला या गोष्टी सांगणे चुकीचे आहे. यामुळे त्या व्यक्तीचे मन देखील बदलू शकते आणि यामुळे वाईट गोष्टी देखील घडू शकतात.
पती-पत्नी मधील गोष्टी इतरांना सांगू नये– Chanakya Niti
वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी दोघांचं नातं हे पवित्र मानले जाते. पती-पत्नी दोघांमध्ये झालेल्या गोष्टी, पती-पत्नी दोघांमध्ये असलेल्या काही कमजोरी कधीच तिसऱ्या व्यक्तीला सांगू नये. नवरा बायकोने त्यांच्या चुका सुधारून त्यांचे कुटुंब सांभाळने गरजेचे असते. जर पती-पत्नी दोघांपैकी एक जण तिसऱ्या व्यक्तीला आपल्या पार्टनरच्या चुका सांगत असेल तर त्या पार्टनरच्या आत्मविश्वासाला तडा जातो. आणि यामुळे वैवाहिक जीवन संपुष्टात येण्याची देखील शक्यता असते.
अपमान झाल्यास शांत रहा–
प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान हा त्यांच्या वागणुकींवर अवलंबून असतो. जर एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने अपमान झाला तर त्या व्यक्तीने अपमान झाल्याचा धिंडोरा पिटणे अत्यंत चुकीचे आहे. जर तुम्ही तुमचा अपमान झाल्याची गोष्ट एखाद्या व्यक्तीला सांगत असाल तर त्याच्या मनात देखील तुमच्याबद्दल मानसन्मान राहत नाही. आणि तो व्यक्ती देखील तुमचा पदोपदी अपमान करत राहतो.
फसवणूक होणे –
जर तुमच्या सोबत एखाद्या वेळेस फ्रॉड झाला असेल तर आपली फसवणूक झाल्याची घटना प्रत्येकाला सांगत बसू नका. अशा गोष्टी इतरांपासून लपवणे गरजेचे असते. तुमच्या सोबत फसवणूक झाल्याची गोष्ट तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितली तर ते तुम्हाला मूर्ख समजतील. आणि अशामुळे प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत फ्रॉड करेल.