Chanakya Niti : ‘या’ व्यक्तींपासून रहा सावधान; कोणालाही देऊ शकतात धोका

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्र या संग्रहामधून आपण यशस्वी होण्यासाठी  काही नीती आचरणात आणत असतो. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीति (Chanakya Niti) मध्ये बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे योग्य आहे हे देखील चाणक्य सांगतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवनावर देखील आचार्य चाणक्य यांनी भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्तीला त्याचा खरा मित्र कोण आहे आणि कोण भविष्यामध्ये धोका देऊ शकतो हे माहिती असेल तोच व्यक्ती यशस्वी होऊ शकतो.

   

आचार्य चाणक्य म्हणतात की, जीवन जगताना आपल्याला बरेच व्यक्ती भेटतात. त्यापैकी काही व्यक्ती हे चांगल्या स्वभावामुळे आपल्या लक्षात राहतात. तर काही व्यक्तींसोबत राहणे आपण स्वतः टाळले पाहिजे. जेणेकरून आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. जर तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये  यशस्वी होऊ इच्छित असाल तर या व्यक्तींपासून लांब राहणे गरजेचे आहे. जेणेकरून आयुष्यात तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

१) रागीट व्यक्ती

जीवनामध्ये बऱ्याचदा आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीवरून राग राग करणारे व्यक्ती भेटत असतात. हे व्यक्ती कोणत्याही कारणावरून राग राग करतात. असे व्यक्ती रंगीत स्वभावामुळे स्वतःलाच नाही तर दुसऱ्यांना देखील संकटात पाडू शकतात. जेव्हा एखादा व्यक्तीला राग येतो तेव्हा त्या व्यक्तीला खरं आणि खोटं  यामध्ये कोणताच फरक दिसून येत नाही. आचार्य चाणक्य सांगतात रागीट व्यक्तींवर कधीच विश्वास ठेवू नये. आणि अशा व्यक्तींना  आपल्या आयुष्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा रागीट व्यक्तीसोबत राहिल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.

२) स्वार्थी- Chanakya Niti

स्वतःच्या हिताचा विचार करणारा स्वार्थी व्यक्ती कधीच त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. दुसऱ्यांपूर्वी स्वतःचा विचार करणारे व्यक्ती सतत स्वतःचा फायदा पाहत असतात. जेणेकरून इतरांना नुकसान देखील पोहोचू शकते. एवढेच नाही तर वाईट परिस्थितीमध्ये देखील असे व्यक्ती  इतरांची मदत न करता त्यांना आणखीन वाईट परिस्थितीत टाकू शकतात. असे व्यक्ती कधीच कोणाच्या कामी येत नाही. आचार्य चाणक्य सांगतात (Chanakya Niti) स्वार्थी व्यक्तीपासून कधीही लांब राहणे योग्य आहे. जेणेकरून तुम्ही एखाद्या अडचणीत पडण्यापासून वाचाल.

३) खोटं बोलणारे व्यक्ती

जे व्यक्ती पावलोपावली खोटे बोलतात त्या व्यक्तीपासून लांब राहणे खूप गरजेचे आहे. खोटं बोलणारे व्यक्ती कधीही धोका देऊ शकतात. खोटं बोलणारे व्यक्ती कधीच विश्वासाच्या लायकीचे नसतात. अशा व्यक्तीपासून लांब राहिल्यास आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. त्याचबरोबर खोटं बोलणारे व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

४) जास्त स्तुती करणारे व्यक्ती

जे व्यक्ती इतरांची सतत वाहवा करण्यापासून थकत नाही, अशा व्यक्ती पासून लांब राहणे गरजेचे आहे. कारण असे व्यक्ती आपल्या समोर वाहवा करत असले तरीदेखील इतरांना आपल्याबद्दल वाईट सांगत असतात. आयुष्यामध्ये जे व्यक्ती तुमची स्तुती न करता तुमच्यातील दोष तुम्हाला सांगत असेल ते व्यक्ती खरे मित्र असतात. सतत स्तुती करणारे व्यक्ती कधी धोका देतील हे सांगता येत नाही.