Chanakya Niti : ‘या’ व्यक्तीपासून कुटुंबानेही लांब राहिलेलंच बरं; चाणक्यांनी असं का सांगितलं?

Chanakya Niti । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. हे प्राचीन भारतीय राजनीति शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र आपल्या सर्वांच्या ओळखीतील संग्रह आहे. आचार्य चाणक्य सांगतात की कुटुंबामध्ये सर्व सदस्य त्यांचे त्यांचे कर्तव्य पूर्ण करत असतात. जर सर्व सदस्य त्यांचे कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडत असतील तर कुटुंबामध्ये सुख शांती लाभते. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचे कोणते ना कोणते कर्तव्य असते. कर्तव्य पूर्ण करणे त्यांची जबाबदारी असते. चाणक्यानी हेही सांगितले आहे की, कोणते वर्तन केल्यानंतर व्यक्तीला कुटुंबाने दूर ठेवले पाहिजे.

   

विश्वासघात करणारा व्यक्ती-

चाणक्यनीती नुसार, एखाद्या कुटुंबामध्ये विश्वासघात करणारा व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत राहणे आणि संवाद साधने देखील चुकीचे असते. अशा व्यक्तींसोबत त्यांचे मुलं, पत्नी, कुटुंबातील सदस्य सर्वजण बोलणे सोडतात. आणि अशा व्यक्तींचा त्याग करतात. विश्वास ही अशी गोष्ट आहे, तिला एकदा तडा गेला कि, परत जुळत नाही. त्यामुळे विश्वासार्हता टिकून ठेवणे गरजेचे आहे. एखादा व्यक्ती सतत भांडण तंटा करत असेल तर अशा व्यक्तींचा कुटुंबातील सर्व सदस्य त्याग करत असतात. जेणेकरून कुटुंबामध्ये शांती राहील.

चूगलखोरी करणे मानसिक पाप– Chanakya Niti

विश्वासघात करणाऱ्या आणि चूगलखोरी करणाऱ्यांवर कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे. विश्वासघात आणि इकडची गोष्ट तिकडे सांगणारे व्यक्ती विश्वासाच्या लायकीचे नसतात. अशा व्यक्तींना कोणतीही गोष्ट सांगितल्यास त्या व्यक्तीसोबतच आपली बदनामी होते. आचार्य चाणक्य म्हणतात, चुगलखोरी करणे हे एक मानसिक पाप असून असे करणाऱ्या व्यक्तींनी कितीही चांगले काम केले तरी वर्षानुवर्षे त्यांनी केलेल्या चुका लक्षात ठेवल्या जातात आणि अशा व्यक्तींना कधीच चांगले म्हटले जात नाही.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक जण मार्गदर्शन करत असतो. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचे आपण सर्व ऐकतो परंतु लहान मुलांनी केलेले मार्गदर्शन देखील आपल्या उपयोगी पडत असते. त्यामुळे लहान असो की मोठा प्रत्येकाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे पालन करणे देखील गरजेचे आहे. जर तुम्हाला रस्त्यावरून जात असताना एखाद्या तुच्छ किंवा सामान्य व्यक्तीने जरी एखादे ज्ञान दिले तर ते तुमच्या उपयोगी पडणारेच असते. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्यानुसार, ज्याप्रमाणे एखादा चिखलात एखादा हिरा पडलेला असेल तर तो ज्याप्रकारे उचलणे गरजेचे आहे. त्याच प्रकारे सर्वसाधारण व्यक्ती एखादी महत्त्वाची गोष्ट किंवा माहिती देत असेल तर ती माहिती आचरणात आणण्यास संकोच करू नये.