टाइम्स मराठी । चाणक्यानीती (Chanakya Niti) तर तुम्हाला माहीतच असेल. थोर नीतीशास्त्र आचार्य चाणक्य यांनी आपल्या लेखणीचे जीवनाविषयक संपूर्ण ज्ञान सांगितलं आहे. आयुष्यात यशस्वी होण्याच्या उपायांपासून ते जीवन कसे जगावे इथपर्यंत चाणक्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच जीवन जगताना कशाप्रकारे जगले पाहिजे कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे देखील ते आपल्याला सांगतात. लग्न झालेल्या पती- पत्नीमध्ये नातं कस असावं? सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने नेमकं काय करावं? याबाबतचे मार्गदर्शन सुद्धा आचार्य चाणक्य यांनी केलं आहे.
आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतिनुसार, हिंदू धर्मात पती-पत्नीच्या नात्याला पवित्र मानले जाते. पती-पत्नी हे एक धाग्याप्रमाणे असतात. या दोन्ही धाग्यांपैकी एकही डगमगला तर कुटुंब तुटायला वेळ लागत नाही आणि घरामध्ये प्रचंड प्रमाणात भांडण सुरू होतात. पती-पत्नीच्या नात्यावरच कुटुंबाची सुख शांती अवलंबून असते. त्यानुसार ज्या घरांमध्ये पती-पत्नीचे एकमेकांवर प्रेम वाढत नाही त्या घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही. आपले वैवाहिक जीवन सुखदायी व्हावे आणि कुटुंब चांगले रहावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
१) एकमेकांचा मान सन्मान आणि आदर गरजेचा
वैवाहिक जीवनात पती हा पत्नीवर एखादी गोष्ट लादत असेल तर पत्नीला ते सहन होत नाही. यामुळे पती आणि पत्नीचे भांडण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे वैवाहिक जीवन जगत असताना पती-पत्नी यांनी मित्र म्हणून राहणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रेमामध्ये पतीने पत्नीला तेवढाच आदर देणे गरजेचे आहे जेवढा पत्नीने पतीला. प्रेमाबद्दलआदर असेल तरच नाते टिकत असते. म्हणूनच नेहमी एकमेकांचा आदर करणे गरजेचे आहे. पती-पत्नी दोघांनाही कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे? कोणत्या गोष्टीमुळे वाद होऊ शकतो हे दोघांनीही समजून घेणे गरजेचे आहे.
२) नात्यात अहंकार नको– Chanakya Niti
चाणक्य नीति नुसार, पती-पत्नी यांचं नातं एक धाग्याप्रमाणे आहे. एकदा धागा डगमगला की संपूर्ण कुटुंब अस्ताव्यस्त होऊन जाते. प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी पती-पत्नीने स्पर्धक म्हणून नाही तर एक ग्रुप म्हणून काम केले पाहिजे. पती-पत्नी या दोघांमध्ये अहंकार असेल तर नाते तुटायला वेळ लागत नाही. कारण मी पणा आणि अहंकार नात्यांमध्ये आल्यास नात्यांमध्ये दुरावा येतो. त्यामुळे पती-पत्नींनी एकमेकांना कधीच अहंकार दाखवू नये.
3) संयम ठेवणे गरजेचे
चाणक्य नीति नुसार, (Chanakya Niti) वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी दोघांनी संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी पती-पत्नी यांनी थोडासा संयम ठेवून त्या परिस्थितीवर मात केली पाहिजे. जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन सुखदायी जाईल. जे पती-पत्नी संयम ठेवून आणि एकमेकांवर विश्वास ठेवून परिस्थितीवर मात करतात असेच व्यक्ती त्यांचे वैवाहिक जीवन जपू शकतात.
4) दोघांमधल्या गोष्टी तिसऱ्याला कळता कामा नये
वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी हे दोघेही एकमेकांना काही रहस्य सांगत असतात. यामुळे त्यांच्या दोघांमधील नातं पक्के होते. परंतु पती-पत्नी यांनी दोघांमधील संवाद किंवा रहस्य तिसऱ्या व्यक्तींना सांगणे अयोग्य आहे. यामुळे पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. आणि गैरसमज देखील होऊ शकतो.