Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या व्यक्तींपासून लांब रहा

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आहे.आचार्य चाणक्यांनी केलेले लेखन, ज्ञान व्यापार आणि मार्गदर्शन साहित्य प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यापैकी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, चाणक्य नीति, कौटिल्य अर्थशास्त्र आणि कौटिल्य सूत्रे हे लेखन मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.आपल्या सर्वांना त्यांनी लेखन केलेल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) अनुभवांचा संग्रह माहिती आहे. या संग्रहामुळे माणसांना त्यांच्या जीवनात खचून न जाता पुढे कसं जावं यासाठी प्रेरणा मिळते. आचार्य चाणक्य म्हणतात, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काही व्यक्तींची बुराई करणे टाळले पाहिजे. या संग्रहामध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. जेणेकरून आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि इतरांचा मानसन्मान करू शकतो.

   

१) गुरु मधील दोष शोधू नका

आचार्य चाणक्य म्हणतात की, कधीही आपल्या गुरुची अवहेलना, त्यांच्यातील दोष शोधून त्यांची मानहानी करू नका. गुरुने दाखवलेला मार्ग हा प्रत्येक क्षणी आपल्याला कामात येत असतो. गुरु प्रत्येक वेळेस शिष्याचे हे कोणत्या गोष्टींमध्ये आहे याची जाणीव करून देत असतो. त्यामुळे आपला गुरु बद्दल कधीही वाईट बोलू नये. त्यामुळे गुरूंच्या मनातील भावना शिष्याने समजून घेतली पाहिजे. गुरु आपल्याला यशस्वी होण्यासाठी जो मार्ग दाखवत आहे त्याच्यावर नाराज होऊन गुरूंची कधीच मानहानी करू नये.

२) निंदनीय व्यक्तींपासून दूर राहा

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने निंदनीय व्यक्तींपासून दूर राहणे गरजेचे आहे. जे व्यक्ती दुसऱ्यांची निंदा करतात ते आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे निंदा करणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहणे योग्य आहे. जे व्यक्ती इतरांवर टीका करतात, भांडण करतात, अनैतिक कृत्य करतात अशा व्यक्ती यशस्वी होत नाही. ते त्यांच्या लेव्हलपर्यंतच राहतात. अशा व्यक्तींसोबत तुम्ही राहिल्यास तुम्ही देखील कधीच यशस्वी ठरू शकत नाही.

३) वाईट व्यवहार करणाऱ्या मित्रांपासून लांब रहा

जो व्यक्ती चांगल्या लोकांसोबत वाईट व्यवहार करतो, जो व्यक्ती जवळच्या मित्रांना देखील चुकीच्या पद्धतीने वागणूक देतो अशा व्यक्तींसोबत राहणे टाळले पाहिजे. अशा व्यक्तींना वेळ आल्यावर नातेवाईक आणि जवळची लोक देखील सोडून देतात. अशा व्यक्तींना कोणीही मदत करत नाही. असे व्यक्ती कधीही मैत्री करत असताना दुर्गुण शोधत असतात. इतरांमध्ये असलेले दोष शोधून त्यांची अवहेलना करतात. हे व्यक्ती स्वार्थासाठी मैत्री करत असतात. आणि हेच मित्र त्यांचे शत्रू बनतात. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहणे गरजेचे आहे.