Chanakya Niti For Couples : सुखी वैवाहिक जीवनासाठी पती- पत्नीने काय करावं? चाणक्यांनी सांगितली नेमकी गोष्ट

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतिच्या माध्यमातून आपण अनेक चांगल्या- वाईट गोष्टी समजू शकतो. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच समस्येचा सामना करत जीवन यशस्वीपणे जगले आहे. त्यानुसार चाणक्य नीति मध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवना संबंधित काही नीती, जीवनात यशस्वी होण्यासाठी काही नीती, वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नीती (Chanakya Niti For Couples) सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये उपयोगी ठरतात.

   

आचार्य चाणक्य सांगतात की, पती-पत्नी यांनी वैवाहिक जीवन जगत असताना (Chanakya Niti For Couples) काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवन जगत असताना पती-पत्नीमध्ये प्रेमाची भावना असेल तर ते नाते टिकते. परंतु वैवाहिक जीवनामध्ये प्रेमाची भावना नसेल तर वैवाहिक जीवनाला हानी पोहोचू शकते. आचार्य चाणक्य यांनी आजच्या चाणक्य नीति मध्ये वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीला माहिती असणे गरजेचे असलेल्या नीती बद्दल सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते, वैवाहिक जीवनामध्ये (Chanakya Niti For Couples) पतीने पत्नीच्या संपूर्ण गरजांकडे आणि सुरक्षिततेकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. ही पतीची सर्वात मोठी जबाबदारी आहे. पतीने सतत पत्नीच्या वेदना आणि भावना समजून घेत वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी जगले पाहिजे. पती जर पत्नीला वेळ देत नसेल किंवा पत्नीच्या भावना समजून घेत नसेल तर  वैवाहिक जीवनात अडथळा येऊ शकतो.

पती-पत्नीचे कर्तव्य-

चाणक्य नीति प्रमाणे, पतीप्रमाणे पत्नीने देखील पतीच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. पत्नीने पतीच्या चांगल्या किंवा वाईट काळामध्ये साथ देने देखील अत्यंत गरजेचे आहे. जर पती-पत्नीने त्यांची कर्तव्य पार पाडली नाही तर वैवाहिक जीवन सुखी होणार नाही. त्यामुळे पत्नीने देखील पती प्रमाणे साथ देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पती निराश किंवा अस्वस्थ असेल तर पतीला समजून घेणे आणि पतीला आधार देणे हे पत्नीचे कर्तव्य आहे.

पती- पत्नीच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे गरजेचे- Chanakya Niti For Couples

पती-पत्नी या दोघांनी वैवाहिक जीवनात कोणताही संकोच न बाळगता जीवन सोबत जगले पाहिजे. यासोबतच पती-पत्नीने एकमेकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे देखील गरजेचे आहे. पत्नीच्या गरजा पूर्ण करणे हे देखील पतीचे महत्त्वाचे  काम असून पती-पत्नी दोघांनीही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणे हे गरजेचे आहे. जेणेकरून आयुष्य सुखदायी होईल.