टाइम्स मराठी । महान मुत्सद्दी, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी आपल्या चाणक्यनीतीच्या माध्यमातून अनेक सल्ले दिले आहेत. आयुष्य यशस्वीपणे जगण्यासाठी काय करावं? लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी कस वागावे? वैवाहिक जीवन सुखी जाण्यासाठी काय उपाय करावे याबाबत चाणक्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. माणसाच्या जीवनात अनेक शत्रू असतात.. कोणी श्रीमंत असो वा गरीब… प्रत्येकाला आपल्या जीवनात शत्रूंचा सामना करावाच लागतो. अशावेळी शत्रूवर विजय मिळवण्यासाठी काय करावं? याबाबत सुद्धा आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये सखोल लिखाण केलं आहे.
नेहमी खुश रहा –
चाणक्यनीतीनुसार, नेहमी खुश रहा. कारण तुमचा शत्रू कितीही मोठा असला तरी तुमचे सुख त्याला बघवत नाही. त्यामुळे तुम्ही आतून कितीही दुखी असला तरी ते दुःख तुमच्या शत्रूला दाखवू नका, याउलट तुमचे चेहरा नेहमी हसरा ठेवा. तुमच्या हसण्यानेच शत्रूची निम्मी शक्ती संपून जाईल. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणजे शत्रूने तुम्हाला कितीही त्रास दिला तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही हे दर्शवते. यामुळे शत्रू अस्वस्थ होऊन रागाच्या भरात चुकीची कामे करून आपल्याच जाळ्यात अडकतील.
प्रत्युत्तर देऊ नका – Chanakya Niti
कोणी आर केलं कि त्याला लगेच कारे करण्याची सवय काहीजणांना असते आणि वादावादी होते. परंतु अशावेळी शांत राहणे कधीही उत्तम .. चाणक्यनीती नुसार, (Chanakya Niti) जेव्हा शत्रू तुम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शांत रहा, जास्त ताण न घेता शांततेत समोरच्या व्यक्तीला उत्तरे द्या, शांत राहणे हि काय तुमची कमजोरी नाही, उलट तीच तुमची खरी पॉवर आहे ज्यामुळे समोरचा व्यक्ती आपोआप शांत राहण्यास भाग पडतो.
रागावर नियंत्रण ठेवा :
युद्ध जिंकण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवावे लागते. तसे न केल्यास, तुमचा राग तुमच्यावरच भारी पडेल. आणि वेळ निघून गेल्यावर आपल्या लक्षात येत कि राग राग करून आपलं चुकलं. त्यामुळे नेहमी शांत डोक्याने शत्रूवर मात करण्याचा प्रयत्न करा.. उगीच ताणताण करून काहीही उपयोग होत नाही. याउलट राग कितीही आला तरी त्यावर योग्य कंट्रोल ठेऊन, शांत डोक्याने, नीट विचार करून शत्रूला हरवा असं आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे.