‘या’ ठिकाणी कधीही बांधू नये घर; पहा काय सांगते चाणक्यनीती

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्याबद्दल कोणाला माहित नाही? प्रत्येकाने चाणक्य यांच्या नीतीबद्दल ऐकलं असेल किंवा वाचलं आहे. आचार्य चाणक्य यांनी माणसाला आयुष्य कसं जगावे इथपासून ते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय काय करावं याबाबत सुद्धा कानमंत्र दिले आहेत. आजकाल अनेक जण नवीन घर बांधतात, किंवा नव्या ठिकाणी घर खरेदी करतात. परंतु घर खरेदी करताना काय काळजी घ्यावी, कोणत्या ठिकाणी घर उभारू नये याबाबत मार्गदर्शक सल्ले दिले (Chanakya Niti For House) आहेत. त्याचे पालन केल्यास तुम्हला लाभ होऊ शकतो.

   

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथात “लोकयात्र भयं लज्जा दक्षिण्यम् त्यागशीलता। पंच यात्रा न विद्यान्ते न कुर्यात्तत्र संगतिम् ll” या श्लोकाद्वारे सांगितले आहे की, माणसाने आपले घर कोणत्या ठिकाणी वसवू नये. या ठिकाणी स्थायिक झाल्याने माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सविस्तर माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊयात….

चाणक्य नीतीनुसार ज्या ठिकाणी ब्राह्मण, श्रीमंत, राजा, नदी आणि वेद जाणणारे वैद्य नसतील अशा ठिकाणी माणसाने एक दिवसही राहू नये. तसेच ज्या देशात दान करण्याची भावना नाही अशा देशात राहू नये, कारण दान केल्याने पुण्य तर मिळतेच पण आत्माही शुद्ध होतो.

आचार्य चाणक्याच्या मते जिथे मान-सन्मान नाही, ज्याठिकाणी उपजीविकेचे साधन नाही, किंवा ज्या भागात मित्र तसेच नातेवाईक नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे ज्ञान आणि गुण मिळवण्याची शक्यता नाही, अशा देशाला सोडणे कधीही चांगले. त्यामुळे अशा ठिकाणी घर बांधु नये.

माणसाने नेहमी अशा ठिकाणी घर बांधावे ज्याठिकाणी त्याला काहीतरी ज्ञान मिळेल, रोजगाराजाच्या आणि कौश्यल्याच्या संधी मिळतील. यामुळे माणसाच्या जीवनात भरभराटी येऊ शकते.

माणसाने नेहमी अशा ठिकाणी राहावे जिथे कोणीही स्वताच्या स्वार्थासाठी कोणताही कायदा मोडत नाही. आणि नेहमी समाजसेवेला प्राधान्य दिले जाते. ज्याठिकाणी सर्व नागरिक गुण्यागोविंदाने आणि कोणते भांडण- तंटा न करता राहतात अशा ठिकाणी घर बांधावे.