Chanakya Niti For Husband : नवऱ्याने बायकोला कधीही सांगू नयेत ‘या’ गोष्टी; अन्यथा होईल नुकसान

Chanakya Niti For Husband । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्याबाबत तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये मनुष्यला जीवनविषयक अनेक सल्ले दिले आहेत. आचार्य चाणक्य यांच्यामते, आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला बऱ्याच गोष्टींचा विचार करणे आणि काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून ते काही संकटांचा मात करू शकतील. त्याचप्रकारे जीवनात अनेक समस्या टाळण्यासाठी बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवणे गरजेचे आहे.  काही व्यक्तींच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही. म्हणजेच त्या व्यक्ती त्यांच्या पोटात कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाहीत. परंतु हे अत्यंत चुकीचे असून यामुळे प्रचंड प्रॉब्लेम होऊ शकतात.  एवढेच नाही तर वैवाहिक जीवनामध्ये देखील जीवनसाथी म्हणून आपल्या सोबत असलेल्या पत्नीला देखील काही गोष्टी सांगणे टाळले पाहिजे. या कोणत्या गोष्टी आहे ते आपण आज पाहणार आहोत.

   

दान पुण्य करणे– Chanakya Niti For Husband

एखाद्या व्यक्तीला दान करणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही करत असलेले दान हे गुप्त ठेवणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते तुम्ही करत असलेले दान हे गुप्त ठेवायला पाहिजे. तुम्ही पुण्य मिळवू इच्छित असाल तर तुम्ही केलेले दान कधीच तुमच्या पत्नीला किंवा कुटुंबातील सदस्यांना सांगू नये. कारण यामुळे पत्नी तुम्हाला पुढे दान करण्यासाठी रोखू शकते.

चुकूनही तुमची कमजोरी बायकोला सांगू नये

आचार्य चाणक्य म्हणतात की वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी यांचे नाते अतूट असते. यासोबतच विश्वासामुळे या दोघांचाही नातं टिकतं. परंतु पतीने कधीच पत्नीला चुकूनही त्यांची कमजोरी सांगू नये. तुमची कमजोरी तुमच्या पत्नीला समजल्यास त्याचा फायदा पत्नी उठवू शकते. आणि यामुळे तुम्हाला पत्नीची चुकीची इच्छा पूर्ण करावी लागू शकते. आणि वैवाहिक जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

तुमचा पगार पत्नीला सांगू नका

आचार्य चाणक्य यांच्या मते, (Chanakya Niti For Husband) पतीने पत्नीला कधीच त्यांचा पगार सांगू नये. आचार्य चाणक्य म्हणतात, वैवाहिक जीवनामध्ये काही गोष्टी पतीपासून लांब ठेवल्या तर आयुष्य सुखरूप होईल. त्यानुसार जर तुम्ही पत्नीला तुमचा पगार सांगितला तर तुम्हाला रोज तुमच्या पत्नीला हिशोब द्यावा लागेल.  किंवा पैसे खर्चण्यासाठी पत्नी रोखठोकपणे काहीही विचारू शकते.

अपमान झाल्यास सांगू नये

चाणक्य म्हणतात की, पतीने कधीच पत्नीला घडलेल्या घटना सांगू नये. जर ऑफिसमध्ये किंवा कोठेही तुमचा अपमान झाला असेल तर याबाबत पत्नीला कधीच सांगू नका. नाहीतर भविष्यात भांडण झाल्यावर पत्नी या या गोष्टी पुन्हा पुन्हा काढू शकते. आणि टोमणे मारू शकते.