टाइम्स मराठी । आचार्य आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्याबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीतीच्या माध्यमातून अनेक चांगले सल्ले दिले आहेत. मनुष्याने आयुष्य कशा प्रकारे जगावे, जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे? कोणत्या प्रकारच्या व्यक्तींवर विश्वास ठेऊ नये याबाबत चाणक्यांनी लिखाण केलं आहे. चाणक्याची नवरा – बायकोच्या नात्याबाबत सुद्धा भाष्य केलं आहे. नवरा बायकोचे नाते कसे असावे, ते आणखी सुधारण्यासाठी काय करावे याबद्दल चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्यनीती नुसार, पत्नीचे हे कर्तव्य आहे की ती तिच्या पतीच्या सर्व व्यवहारांची काळजी घेणं आणि जेव्हा तो दुःखी असेल तेव्हा त्याचे मन शांत करण्याचा प्रयत्न करणे .पत्नीने संकटाच्या काळात पतीला साथ दिल्याने नातेसंबंध आणखी मधुर होते. त्यामुळे संकटाच्या काळात बायकोने नवऱ्याला आधार देऊन सावरलं पाहिजे. त्यासाठी कधीही नाही म्हणू नये….
चाणक्य नीती असेही सांगते की आपल्या पतीच्या प्रेम इच्छा पूर्ण करणे हे पत्नीचे कर्तव्य आहे आणि तिने नेहमी त्याला तिच्या प्रेमाने संतुष्ट केले पाहिजे.सुखी वैवाहिक जीवनासाठी हे महत्त्वाचे आहे की पती आणि पत्नीने एकमेकांमध्ये कधीही अंतर येऊ देऊ नये. नेहमी एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांना प्रेम दिले पाहिजे.. यासाठी पत्नीने कधीही तिच्या नवऱ्याला नाही म्हणायचं नसत.
नवऱ्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस येऊ अथवा दुःखाचे दिवस येवो…. नवर्याच्या प्रत्येक सुखदुःखात त्याच्या बायकोने खंबीरपणे त्यात वाटेकरी व्हावं आणि नवऱ्याचे दुःख हलकं करावे. चाणक्यनीतीनुसार, पत्नीची साथ आणि सोबत असेल तर जगातील कोणताही नवरा यशस्वीच होतो.