Chanakya Niti For Husband : नवऱ्याने बायकोसमोर कधीही बोलू नये या 4 गोष्टी; अन्यथा संसाराला लागेल आग

Chanakya Niti For Husband । आचार्य चाणक्य यांच्या बद्दल तर तुम्ही नक्क्कीच ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीतीच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. आयुष्य कस जगावे? पैसे मिळ्वण्यासाठी काय करावं ? सुखी संसारासाठी आणि यशस्वी होण्यासाठी कोणते प्रयत्न करावे याबाबत त्यांनी लेखन केलं आहे. चाणक्यनीती मध्ये नवरा बायकोच्या नात्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं आहे. नवरा बायकोचे नातं कस असावे? सुखी संसारासाठी नवऱ्याने आपल्या बायकोशी आणि बायकोने आपल्या नवऱ्याशी कस वागावे याबाबत चाणक्यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. चाणक्यनीती नुसार, नवऱ्याने बायकोसमोर कधीही काही गोष्टी बोलू नयेत, अन्यथा सुखी असलेल्या संसाराला आग लागू शकते. चला तर जाणून घेऊयात या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत.

   

तुमचा कमकुवतपणा-

आचार्य चाणक्याच्या मते, नवऱ्याने (Chanakya Niti For Husband) आपली कमकुवत गोष्ट किंवा कमजोरी कधीही आपल्या पत्नीला सांगू नये, कारण जर तुमचंही कमजोरी तुमच्या पत्नीला समजली तर ती त्याचा फायदा घेऊ शकते. किंवा कोणत्या कारणाने तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते. त्यामुळे नवऱ्याने आपले वीक पॉईंट्स बायकोला कधीही सांगू नयेत.

तुमचा झालेला अपमान – Chanakya Niti For Husband

चाणक्यनीती नुसार, जर कधी कोणी तुमचा अपमान केला तर ती गोष्ट किंवा तो प्रसंग नवऱ्याने बायकोला सांगू नये. कारण असं झाल्यास बायको सुद्धा याच गोष्टीच्या जोरावर पदोपदी तुमचा अपमान करू शकते आणि तेव्हा तुम्ही मग तिच्यासमोर काहीच बोलू शकणार नाही.

गुप्तपणे केलेले दान-

चाणक्य नीती सांगते की गुप्तपणे केलेले दान अनेक पटींनी फळ देते. कारण जेव्हा आपण दान करतो तेव्हा ते कोणाला कळता कामा नये, एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळायला नको. जेव्हा आपण दान करतो तेव्हा बायकोला सुद्धा याबाबत सांगू नये. कारण असं झाल्यास जे दान आपण केलं आहे त्याचा प्रभाव कमी होतो.

कमाई सांगू नका –

चाणक्य नीतीनुसार, नवऱ्याने (Chanakya Niti For Husband) कधीही त्याच्या पगाराबाबत संपूर्ण माहिती आपल्या बायकोला सांगू नये. नाहीतर पत्नी ते सर्व पैसे खर्च करण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याकडे किती पैसे आहेत हे पत्नीला सांगत बसण्यापेक्षा ठराविक रकमेची गुंतवणूक करून बचत केलेली कधीही चांगल आहे.