Chanakya Niti For Husband Wife : बायकोपासून लपवून ठेवा ‘या’ 4 गोष्टी, अन्यथा संसाराला लागेल आग

Chanakya Niti For Husband Wife । आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये अनेक मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावं? लक्ष्मीदेवीला प्रसंन्न करण्यासाठी कोणत्या वाईट सवयी सोडाव्या याबाबत चाणक्यांनी आपल्या नीतीत लिहिले आहे. चाणक्यांनी नवरा बायकोच्या नात्याबद्दल सुद्धा अनेक चांगले सल्ले दिले आहेत, त्याचे पालन केल्यास नवरा- बायकोच्या नात्यात कधीही अंतर येणार नाही. चाणक्याच्या मते, नवऱ्याने काही गोष्टी आपल्या बायकोपासून लपवायला हव्यात, नाहीतर तुमच्या संसाराला आग लागू शकते. या गोष्टी कोणत्या आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

   

अपमान-

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मान- अपमानाचा सामना करावा लागतो. जर कोणी तुमचा अपमान गेला तर त्याबाबत कधीच आपल्या पत्नीला सांगू नये.. कारण पुनः जेव्हा तुमचा कधी बाद होईल तेव्हा याच अपमानाबद्दल पत्नी आपल्या नवऱ्याला टोमणे मारायला मागे पुढे बघणार नाही.

कमजोरी – Chanakya Niti For Husband Wife

नवऱ्याने त्याच्या कमजोरीबद्दल किंवा कमकुवत बाजू बद्दल कधीही आपल्या पत्नीला सांगू नये. जर नवऱ्याची दुखती नस बायकोला समजली, किंवा आपला नवरा कोणत्या गोष्टीत कमी आहे हे पत्नीला समजलं तर ती कधीही आपल्या पतीचा आदर करणार नाही. उलट प्रत्येक गोष्टीत नवऱ्याचा अपमानच करेल. म्हणून चाणक्य यांच्या मते नवऱ्याने (Chanakya Niti For Husband Wife) आपल्या कमजोरी बद्दल कधीही बायकोला सांगू नये.

पगार –

नवऱ्याने आपण महिन्याला किती रुपये कमवतो, आपलं उत्पन्न किती याबद्दल सर्व काही खरं पत्नीला सांगू नये, जेणेकरून पत्नी उधळपट्टी करू नये. पतीने ही रक्कम भविष्यासाठी साठवून ठेवावी. कारण अडचणीच्या किंवा संकटाच्या काळात हाच पैसा तुमच्या कामी येण्याची शक्यता असते.

दान-

जेव्हा आपण काही दान करतो तेव्हा ते गुप्त ठेवलं तरच त्याच महत्व असते. त्यानुसार, पतीने आपल्या पत्नीला कधीही कुठे किती दान केलं याबद्दल न सांगितलेलच बर, अन्यथा नवरा बायकोच्या नात्यात दरार येण्याची शक्यता असते. जर दान करायचं असेल तर पती- पत्नीने एकत्रितपणे दान केल्यास कधीही चांगलं.