Chanakya Niti For Husband Wife : बायकोपासून लपवून ठेवा ‘या’ गोष्टी; पहा काय सांगते चाणक्यनीती

टाइम्स मराठी । नवरा बायकोचे नाते म्हणजे अतिशय पवित्र नाते…. पती पतीचे नातं हे विश्वासावर अवलंबून असते. नवऱ्याची बायकोला आणि बायकोची नवऱ्याला साथ असेल तर आयुष्याचा गाडा चांगल्या प्रकारे हाकला जातो. पती- पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम, आपलेपणा आणि काळजी असेल तर ते नातं दिवसेंदिवस बहरत जाते. मात्र अनेकदा काही गैरसमज किंवा अन्य कोणत्या गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये भांडण आणि वाद होतात, आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. यावर उपाय म्हणून आचार्य चाणक्यांनी काही खास टिप्स (Chanakya Niti For Husband Wife) दिल्या आहेत, त्याचे पालन केल्यास नवरा- बायकोमध्ये कोणताही वाद होणार नाही. आचार्य चाणक्याच्या मते प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोपासून ३ गोष्टी लपवून ठेवल्यात पाहिजेत, नाहीतर भविष्यात त्यांना मोठया अडचणींना सामोरं जावं लागू शकते. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नेमक्या आहेत तरी कोणत्या .

   

१) तुमची कमाई –

चाणक्यनीतीनुसार पतीने आपल्या कमाईबद्दल कधीही आपल्या पत्नीला सांगू नये. जर तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुमची बायको अनावश्यक खर्च करण्यास कधीही मागेपुढे बघणार नाही. त्यामुळे भविष्यात तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमची कमाई किती आहे? याचा खरा आकडा कधीच आपल्या बायकोला सांगू नये.

२) तुमची कमजोरी- Chanakya Niti For Husband Wife

आचार्य चाणक्याच्या नीतीनुसार, कोणत्याही नवऱ्याने स्वतःची कमजोरी आपल्या बायकोला सांगू नये. भावनिक होऊन तुम्ही तुमच्या कमजोरी बद्दल बायकोला सांगितलं तर ती त्याचा फायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या कमजोरीचा फायदा पत्नीने घेतल्यास तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकते. तसेच जनमानसात तुमचा अपमान सुद्धा होऊ शकतो.

३) दान –

गुप्त दान हे श्रेष्ठ दान आहे असे म्हणतात. एका हाताने दान करा म्हणजे दुसऱ्याला कळू नये. हे एक सेवाभावी कार्य असून प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार देणगी देते. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीती नुसार, (Chanakya Niti For Husband Wife) नवऱ्याने जेव्हा कधी दानधर्म केला तरी त्याबद्दल आपल्या बायकोल सांगू नये. असं केल्यास तुमचं महत्व कमी होईल.