नात्यात ‘या’ 3 गोष्टी आल्या कि समजा प्रेम तुटणारच; पहा काय सांगते चाणक्यनीती

टाइम्स मराठी । प्रेम हे आजकाय नवीन राहिलेलं नाही. अगदी कमी वयातच अनेकांना बॉयफ्रेंड- गर्लफ्रेन्ड असतात. आजकाल खरं प्रेम मिलन तस कठीणच, परंतु तरीही जगात असे अनेक कपल्स आहेत जे एकमेकांना अगदी भरभरून आणि मनापासून प्रेम देतात. मात्र प्रेम करत असताना जोडीदाराला समजावून घेणं आवश्यक असते. कधी कधी असे अनेक प्रकार किंवा गोष्टी घडतात ज्यामुळे प्रेमात धोका निर्माण होण्याची शक्यता असते किंवा आपल्याला प्रेम गमवावं सुद्धा लागू शकते. असं होऊ नये आणि आपलं प्रेम टिकून राहावं यासाठी विश्वगुप्त शिरोमणी आचार्य चाणक्य यांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. चला याबाबत जाणून घेऊयात.

   

शंका –

आचार्य चाणक्य यांच्या मते, संशयाची कीड नातेसंबंधांना आतून पोकळ करते. त्यामुळे कधीच आपल्या पार्टनर वर शंका घेऊ नका… कधी काय वाटलं तर थेट विचारा आणि संशय किंवा शंका दूर करा, परंतु नात्यात अंतर होईल इथपर्यंत शंका घेऊ नका.

हट्टीपणा –

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीती ‘मध्ये म्हटले आहे की, जर एखादी व्यक्ती प्रेमापेक्षा जिद्दीला अधिक महत्त्व देऊ लागली तर त्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होईल हे नक्की . त्यामुळे आपला हट्ट किनगाव इगो नेहमी बाजूला ठेवा. आपल्या जोडीदाराच्या शब्दाला किंमत देऊन नातेसंबंध आणखी मजबूत करा. आपल्या पार्टनरवर कोणत्याही गोष्टींवर हक्क दाखवू नका…. उलट इगो न दाखवता जोडीदार म्हणले तस ऐका.

स्पर्धा –

कोणतेही नाते हे प्रेम आणि विश्वासाच्या धाग्याने बांधलेले असते. या दोन्ही गोष्टी सोडून जर नात्यात स्पर्धा आणि चुरस निर्माण झाली तर नातं बिघडायला लागतं. त्यामुळे आपल्या साथीदारासोबत कधीही स्पर्धा करू नका. नाहीतर नातं तुटण्याची शक्यता असते.