Chanakya Niti : ‘या’ सवयी असलेल्या मुलीसोबत लग्न केल्यास आयुष्य होईल बरबाद

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्ययांच्या (Chanakya Niti) नुसार, ज्या घरात महिला नियमांचे पालन करून राहतात त्या ठिकाणी दारिद्र्य कधीच येत नाही. लग्न करत असताना आपल्या साठी योग्य अशा जीवनसाथीची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु जीवनसाथी अयोग्य निघाल्यास आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लग्न करत असताना विचार करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. नाहीतर आयुष्य बरबाद होऊ शकते. त्याचबरोबर प्रत्येक मुलाने जीवनसाथी निवडताना मुलींमध्ये बघावे याबाबत आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केलं आहे, ते आपण जाणून घेऊया…..

   

१) धर्म कर्म न मानणारी मुलगी

आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या मुलीचा धर्म कर्म यावर विश्वास नाही त्या मुली सोबत लग्न करणे अयोग्य आहे. ज्या मुलींना आपल्या धर्म आणि कर्म याचं ज्ञान प्राप्त नसते त्या मुली घराघरात फूट पाडतात. त्यामुळे तुमच्या आयुष्याला घरघर लागण्याची शक्यता असते.

2) दुसऱ्यांच्या मर्जीने लग्न करणारी मुलगी

जी मुलगी प्रेशर मध्ये येऊन आई-वडिलांनी सांगितलेल्या मुलासोबत इच्छा नसताना मध्ये लग्न करते अशा मुलीकडून घर आणि नाते सांभाळण्याची आशा ठेवणं चुकीचं आहे. अशी मुलगी कधीच कोणाला सन्मान देऊ शकत नाही. त्यामुळे चाणक्यांच्या मते अशा मुलीशी कधीही लग्न करू नये.

3) रागीट स्वभावाची मुलगी– (Chanakya Niti)

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यामुळे आचार्य चाणक्य म्हणतात की जी मुलगी चिडचिडी, रागीट स्वभावाची असते अशा मुली सोबत लग्न केल्यास घरात कलह निर्माण होतो. त्यामुळे अशी लग्नासाठी मुलगी निवडा किती शांत स्वभावाची असेल.

4) चेहरा नको, गुण पहा –

आचार्य चाणक्य यांच्या मते बुद्धिमान व्यक्तीला खालच्या कुळातील सुंदर मुलीशी लग्न न करता श्रेष्ठ कुळातील, कुरूप म्हणजेच सौंदर्यहीन मुली सोबतच लग्न करायला पाहिजे. बऱ्याचदा लग्न करण्यासाठी सुंदर मुलीची निवड कलेची जाते. परंतु तिच्या गुणांना बघितलं जात नाही. अशा मुलींसोबत लग्न करणं कधीही दुखदायी असू शकतं.