Chanakya Niti For Money : ‘या’ वस्तू दान केल्यास गरीबही होईल श्रीमंत; मिळेल बक्कळ पैसा

Chanakya Niti For Money : आचार्य चाणक्य हे महान अर्थशास्त्रज्ञ आणि राजनीति तज्ञ होते. त्यांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान होते. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहांचे लेखन केले असून त्यांनी केलेल्या लेखनाचा फायदा  ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला होत असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी काही उपाय, जीवनात येणाऱ्या संकटांवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे यावर देखील आचार्य चाणक्य भाष्य करतात. एवढेच नाही तर वैवाहिक जीवन, धनसंपत्ती, चांगल्या वाईट सवयी या प्रत्येक गोष्टींवर ते मत मांडत असतात. त्यांनी सांगितलेल्या नीती या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कामात येतात. आजच्या नीती मध्ये आचार्य चाणक्य यांनी कोणते दान केल्याने घरामध्ये पैसा खेळता राहील याबद्दल सांगितले आहे.

   

आचार्य चाणक्य म्हणतात की, लक्ष्मी आणि कुबेर हे सोडून आजच्या काळामध्ये पैशांची (Chanakya Niti For Money) गरज नाही. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती करोडपती अरबपती बनू इच्छित आहे. आणि जो व्यक्ती करोडपती आहे, असे व्यक्ती त्यांचे बँक बॅलन्स अजून वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या जगामध्ये पैशाला खूप महत्त्व दिले जात असून प्रत्येक व्यक्तीसाठी पैसा हा महत्त्वाचा झाला आहे. या संदर्भात आचार्य चाणक्य यांनी काही नीती सांगितल्या आहेत. या नितीचे पालन केल्यास  आणि काही वस्तूंचे दान केल्याने व्यक्ती कधीच गरीब होऊ शकत नाही. काही वस्तू दान केल्यास  दानशूर व्यक्तींच्या तिजोरीत पैसा कायम राहतो.

१) धार्मिक दान-

आजच्या चाणक्य नीति मध्ये आचार्य चाणक्य यांनी दान करण्याचे महत्व सांगितले आहे. धार्मिक कार्यात आणि कर्मकांडात धनदान करणे हे महादान म्हंटले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने धार्मिक कार्यामध्ये दान केले पाहिजे. जेणेकरून तुमच्या तिजोरीत पैसे खेळते राहतील. धार्मिक कार्यामध्ये दान करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पगारातील काही भाग बाजूला काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर धार्मिक कार्यात दान करताना कधीच कंजूसी करू नये. कारण तुम्ही केलेल्या धार्मिक दानाचा लाभ हा पुढच्या जन्मापर्यंत प्राप्त होतो. याशिवाय लक्ष्मी देवी देखील प्रसन्न होते.

२) सामाजिक कार्य- Chanakya Niti For Money

प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करत असतो. तुम्हाला देखील श्रीमंत व्हायचे असेल किंवा तुमच्या तिजोरी मध्ये पैसे सतत राहावे असे वाटत असेल, तर सामाजिक कार्यामध्ये दान करणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक कार्यामध्ये दान केल्याने मान सन्मान वाढतो. यासोबतच पद प्रतिष्ठेत देखील वाढ होते. सामाजिक कार्यामध्ये गरीब व्यक्तींना यांना खरच पैशांची गरज आहे अशा व्यक्तींना दान केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते. याशिवाय आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी मिळते.

३) अन्नदान-

अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखले जाते. तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान केले तर तुमच्या आयुष्यामध्ये अन्नाची कमी कधीच भासणार नाही. गरजू व्यक्तींना अन्नदान, गरीब व्यक्तींना शिक्षा, पैसे दान केल्यास आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर तुम्हाला मदत मिळू शकते. यासोबतच माता लक्ष्मी देखील अशा व्यक्तींवर प्रसन्न होते.